२० वर्षाची टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्माने आ’त्मह’त्या केली आहे. हि धक्कादायक बातमी जेव्हा समोर आली तेव्हा सर्वांचे होश उडाले आहेत. टुनिशा शर्मा सध्या सब टीव्हीवरील दास्तान ए काबुल सिरीयलमध्ये मुख्य भूमिका करत होती. अशामध्ये तिने इतके मोठे पाऊल कशामुळे उचलले हे अजून देखील कोणाला समजलेले नाही.
माहितीनुसार टुनिशाने शोच्या सेटवरच इतके मोठे पाऊल उचलले आणि शोच्या मुख्य अभिनेत्याच्या मेकअप रूममध्येच ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली. तिचा लटकलेला मृ’तदे’ह कोणीतरी पाहिला आणि तिचा तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
जिथे तील मृत घोषित करण्यात आले. तथापि याबद्दल जास्त काही माहिती समोर आलेली नाही. टुनिशाने असे का केले आणि इतके मोठे पाऊल कशामुळे उचलले याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पण सेट तिने इतके मोठे पाऊल उचलल्यामुळे प्रत्येकजण हैराण झाले आहे. टुनिशा अवघ्या २० वर्षाची होती आणि तीक्या कमी वयामध्ये तिला सर्वात चर्चित शोमध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली होती. अशामध्ये तिच्यासाठी हि खूपच चांगली वेळ होती. ती खूपच लोकप्रिय होत चालली होती.
अली बाबा- दास्तान ए काबुल मध्ये मरियमच्या भूमिकेमध्ये दिसणारी अभिनेत्री टुनिशा याआधी देखील अनेक सिरियल्समध्ये पाहायला मिळाली आहे. चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूंछवाला, भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप, इंटरनेट वाला लव आणि इस्क सुभानअल्लाह सारख्या शोमध्ये ती पाहायला मिळाली आहे. याशिवाय तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. कहानी २, बार बार देखो आणि फितूरमध्ये देखील ती दिसली आहे. कॅटरीनाच्या दोन चित्रपटांमध्ये ती लहानपणीच्या भुमिकेमध्ये दिसली होती.
Maharashtra | TV actress Tunisha Sharma committed suicide by hanging herself on the set of a TV serial. She was taken to a hospital where she was declared brought dead: Waliv Police
— ANI (@ANI) December 24, 2022