टीव्ही अभिनेत्री तुनिशाच्या अकाली निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मात्र अभिनेत्रीच्या आईवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची कल्पना कोणी करू शकत नाही. तुनिशाने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जगातून एक्झिट घेतली. सध्या तुनिशाच्या निधनाची चौकशी सुरु आहे.
मात्र यादरम्यान आता तुनिशाच्या आईचा खूपच भावूक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. लाद्ख्या लेकीला अखेरचा निरोप देताना तुनिशाच्या आईची शुद्ध हरपली होती. तुनिशाच्या आईचा व्हिडीओ काळजात चर्रर करणारा आहे. तुनिशाच्या आईचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे.
लाडक्या लेकीला गमवल्यानंतर तुनिशाची आई खूपच खचली आहे. त्यांना नीट चालता देखील येत नव्हते. हा व्हिडीओ पाहून तुनिशाला न्याय मिळाला असे चाहते मागणी करत आहेत. सोमवारी तुनिशाचे कुटुंबीय मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते.
माहितीनुसार तुनिशाचा मृतदेह पाहून तिच्या आईला भोवळ आली आणि त्या तिथेच कोसळल्या. त्या पूर्णपणे खचल्या होत्या. दरम्यान आपल्या लेकीला शेवटचा निरोप देताना तुनिशाच्या आईला अश्रू अनावर झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना सावरले.
२४ डिसेंबर रोजी तुनिशाने अली बाबा: दास्ता-ए-काबूल सिरीयलच्या सेटवर आ त्मह त्या केल्याचे समोर आले होते. तिच्या मृत्यूमागे नेमके कोणते कारण होते याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणामध्ये तुनिशाचा एक्स बॉयफ्रेंड शिजान खानला ताब्यात घेण्यात आले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram