Tripti Dimri ने शेयर केला ‘एनिमल’चा अनुभव: म्हणाली; मला पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत

By Viraltm Team

Published on:

Tripti Dimri

रणबीर कपूर स्टारर चित्रपट ‘एनिमल’ (Animal) 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये तृप्ती डिमरी (Tripti Dimri) देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली. चित्रपटामध्ये रणबीरने साकारलेल्या दमदार भुमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक हॉट आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबतच्या रणबीरच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीलाही चांगलीच दाद मिळत आहे. तृप्तीने चित्रपटामध्ये झोयाची भूमिका साकारली आहे.

एका मुलाखतीदरम्यान तृप्तीने रणबीरसोबत ‘एनिमल’ (Animal) चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली कि, रणबीरसोबत काम करणे खूपच चांगला अनुभव होता. तो एक उत्तम अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो अतिशय वॉर्म अँडड वेलकमिंग नेचरचा आहे. मला त्याच्यासोबत काम करून खूप आनंद झाला. रणबीरसोबतच्या माझ्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीचे दर्शक खूप कौतुक करत आहेत हे खूप छान वाटतं. भविष्यात मी रणबीरसोबत पुन्हा काम करेन, अशी आशा आहे.

आलिया भट्टने देखील तृप्ती डिमरी (Tripti Dimri) चे केले कौतुक

आलिया भट्ट(Alia Bhatt) ने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली होती. तिने ‘एनिमल’चा’ च्या टीमला शुभेच्छा दिल्या. आलियाने त्या पोस्टवर तृप्तीचे देखील कौतुक केले. तिने अप्रतिम अभिनय, खरच तुझे पात्र खूप छान साकारले असे लिहिले आहे.

कोण आहे तृप्ती डिमरी (Tripti Dimri)

तृप्ती डिमरी (Tripti Dimri) ने आपल्या करियरची सुरुवात 2017 मध्ये पोस्टर बॉईज चित्रपटामधून केली होती. शिवाय ती कला, बुलबुल आणि लैला मजनू सारख्या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाली. इतकेच नाही तर तृप्ती डिमरी अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबतच्या लिंकअपमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहिली. तथापि दोघांचे रिलेशनशिप फार काळ टिकले नाही आणि दोघे जुलै 2023 वेगळे झाले. तृप्तीचे बुलबुल आणि कला दोन्ही चित्रपट कार्नेशच्या प्रोडक्शन बॅनर क्लीन स्लेट फिल्म्स अंतर्गत बनवले गेले होते.

‘एनिमल’ ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

1 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या ‘एनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ११६ करोडची कमाई केली. यातील 63.80 करोड रुपये भारतामध्ये कमवले आहेत. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 66 करोडची कमाई केली. म्हणजेच ‘एनिमल’ ने दोन दिवसांमध्ये जवळ जवळ 236 करोडची कमाई केली आहे.

चित्रपटाला दर्शकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. वर्ड ऑफ माउथ ने देखील चित्रपटाला चांगलाच फायदा मिळाला आहे. चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंगचा डेटा पाहता, पहिल्या वीकेंड पर्यंत डोमेस्टिक बॉक्स ऑफिस चित्रपटा 200 करोडपेक्षा जास्त कमाई करेल.

रणबीर दिसतोय खतरनाक अंदाजात

‘एनिमल’ (Animal) चित्रपटात रणबीर कपूर खतरनाक अंदाजामध्ये पाहायला मिळत आहे. रणबीर त्याच्या लव्हर बॉय इमेजपेक्षा वेगळ्या अँग्री बॉयची भूमिका साकारत आहे. चित्रपटामध्ये अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. बॉबी देओलने आपल्या जबरदस्त अभिनयाने दर्शकांचे मन जिंकण्यात यश मिळवले आहे. पिता-पुत्राच्या नात्यावर आधारित चित्रपटाची कथा प्रेक्षकांना रोलरकोस्टर राईडवर नक्कीच घेऊन जाते.

Leave a Comment