या वर्षातील रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित Animal movie आज शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. नुकतेच मेकर्सनी मुंबईमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. या इवेंटमध्ये चित्रपटाची कास्ट रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल आपल्या कुटुंबासोबत पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर आलिया भट्ट आणि नीतू कपूरने आपापल्या पद्धतीने चित्रपटाचे रीव्हीव दिले.
आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांनी दिला Animal movie चा रीव्हीव
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal movie हा क्राईम थ्रिलर आधारित आहे. चित्रपटामद्ये रणबीर कपूर हिंसक भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. आज 1 डिसेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी काल रात्री स्टार्ससाठी स्क्रिनिंग आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बॉलीवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. अभिनेता रणबीरची पत्नी आलिया भट्ट आणि आई नीतू कपूर यांनी देखील कुटुंबासोबत हा चित्रपट पाहिला आणि आपला रिव्ह्यू दिला.
थिएटरमधून बाहेर पडताचा आलिया भट्टला मीडियाने घेरले. यानंतर जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तिला चित्रपट हा आवडला का, तेव्हा आलियाने पहिला स्माईल दिली आणि नंतर चित्रपट खूपच चांगला असल्याचे म्हटले. यानंतर अभिनेत्रीने पुन्हा ‘खतरनाक’ असे म्हंटले. तर नीतू कपूरने ‘अॅ्निमल’चा रिव्ह्यू देताना थम्ब्स अप केले.
आलियाच्या टी-शर्टने वेधले सर्वांचे लक्ष
पती रणबीर कपूरच्या खास दिवशी त्याला सपोर्ट करण्यासाठी आलिया भट्ट अतिशय स्टायलिश अंदाजामध्ये पोहोचली होती. या दरम्यान तिने ब्लॅक पँट आणि ब्लॅक ब्लेझर परिधान केला होता. तर आलियाने जो टी-शर्ट घातला होता त्यावर एनिमल संबंधित रणबीर कपूरचा फोटो प्रिंट करण्यात आला होता.
शुक्रवारी रिलीज झालेला एनिमल एक जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. हा चित्रपट आज 1 डिसेंबर 2023 रोजी विकी कौशलच्या ‘साम बहादूर’ चित्रपटा सोबत मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे.