देशभरातील अनेक बातम्या जाणून घेण्यासाठी आपण न्यूज चॅनल पाहतो. बहुतेक लोक दिवसामधून फक्त एकदाच न्यूज पाहतात. यादरम्यान आपल्याला अँकर आणि पत्रकार देखील पाहायला मिळतात. जे आपल्याला बातम्या सांगत असतात. मिडिया जगतामध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांना लोक खूप पसंत करतात. आज आपण अशा काही महिला पत्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या ग्लॅमरच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देतात.

अंजना ओम कश्यप: अंजना ओम कश्यप खूपच सुंदर आणि हुशार अँकर आहे. अंजना इंडिया टुडे ग्रुपच्या आजतक या हिंदी न्यूज चॅनलवर लेखक आणि संपादक आहे. आजच्या काळामध्ये अंजना ओम कश्यपची लोकप्रियता एखाद्या सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही.

श्वेता सिंह: श्वेता सिंह देखील आज तकची अँकर आणि उपसंपादक आहे. श्वेता सिंह आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे खूप प्रसिद्ध आहे. आजतकच्या अगोदर श्वेता सहारा न्यूज आणि हिंदुस्तान टाईम्ससाठी देखील काम करत होती. पत्रकार श्वेता सिंह सौंदर्याच्या बाबतीत चांगल्या चांगल्या मॉडेल्सला देखील टक्कर देते.

रुबिका लियाकत: रुबिका लियाकत एबीपी न्यूज़ चॅनलवर अँकर आणि पत्रकार आहे. रुबिका आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि सुपरफास्ट बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती आपल्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर तगडी फॅन फॉलोइंग आहे.

मयंती लैंगर: मयंती लैंगर सर्वात सुंदर आणि चर्चित महिला पत्रकारांपैकी एक आहे. मयंती एक स्पोर्ट पत्रकार आहे आणि तिने टेन स्पोर्ट्स न्यूज सारख्या मोठ्या चॅनलसाठी देखील काम केले आहे. सोशल मिडियावर देखील तिचे अनेक चाहते आहेत. मयंतीने टाकलेले फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

रोमाना इसर खान: रोमाना इसर खान एबीपी न्यूज़ चॅनलची अँकर आहे. तिच्या सौंदर्याच्या नेहमी चर्चा होत असतात. एबीपी न्यूज़च्या अगोदर तिने न्यूज २४ साठी देखील काम केले आहे. रोमाना २०१२ मध्ये एबीपी न्यूज़शी जोडली गेली होती. आज ती चॅनलची प्राइम टाइम न्यूज़ अँकर आहे आणि त्याचबरोबर ती क्रिकेट संबंधी कार्यक्रम देखील होस्ट करते.