साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिएन्त कैकला सत्यनारायण यांच्या अंतिम संस्काराच्या २४ तासांमध्येच आणखी एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेता चलपति राव यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चलपति रावच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आरोग्याच्या समस्यांचा सामना करत होते. प्रकृती बिघडल्यामुळे ते अभिनयापासून दूर होते.
चलपति रावचा जन्म १९४४ मध्ये बल्लीपारू, कृष्णा जिल्हा, आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. त्यांनी सीनियर एनटीआर यांच्या प्रोत्साहनाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करियर सुरु केले होते. रावने १९६६ मध्ये रिलीज झालेल्या गुदाचारी ११६ चित्रपटामधून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. सीनियर एनटीआर, कृष्णा, अक्किनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि वेंकटेशच्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले होते. राव यांना सर्वांकडून प्रशंसा मिळाली.
त्यांनी पाच दशकांपेक्षा अधिक आपल्या करियरमध्ये ६०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी प्रोडक्शनमध्ये देखील पदार्पण केले होते आणि कलियुग कृष्णडु, कडपा रेड्डम्मा, जगन्नाटकम, पेलेंटे नुरेला पंटा, प्रेसिडेंटिगारी अल्लुडू, अर्धरात्रि हत्यालु आणि रक्तम चिंदिना रात्री सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.
चलपति राव यांचे सीनियर एनटीआर यांच्यासोबत विशेष संबंध होते. त्यांनी अभिनेत्यांच्या तीन पिढीसोबत स्क्रीन शेयर केली. त्यांना यमगोला, युगपुरुष, ड्राइवर राम, अकबर सलीम अनारकली, भले कृष्णा, शारदा राम, जस्टिस चौधरी, बोब्बिली पुली सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. फाइट विद लॉ, चोर राम, अल्लारी अल्लुडु, अल्लारी, निन्ने पेल्लादता, नुव्वे कावली, सिंहाद्री, बनी, बोम्मारिलु, अरुंधति, सिन्हा आणि दम्मू. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या बंगराजू चित्रपटानंतर ते सिल्वर स्क्रीनवर दिसले नाहीत.
Senior actor Shri #ChalapathiRao (79) garu passed away due to cardiac arrest.
May his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/DRpinZGUw7
— Gopal Karneedi (@gopal_karneedi) December 25, 2022