टिकटॉक स्टार संतोष मुंडे आता या जगामध्ये नाही. मंगळवारी त्याचे शॉक लागून निधन झाले. यानंतर संतोषच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेक लोकानी त्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली. दरम्यान संतोषचा खास मित्र सुरज चव्हाण याचे एक वक्तव्य समोर आले आहे.
हे सर्व सर्वांनाच माहिती आहे कि सुरज आणि संतोष खूप चांगले मित्र आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये दोघांना खूपच चांगली पसंती मिळाली. सुरज हा मुळचा बारामतीचा आणि संतोष हा बीडचा पण तरीही त्यांची चांगली मैत्री होती. अनेकवेळ दोघे एकत्र रील्स बनवत होते.
संतोषच्या अशा अकाली निधनानंतर सुरज चव्हाण मोठा धक्का बसला आहे. त्याने म्हंटले आहे, नमस्कार भावांनो आज मला खूप दु:ख झालं आहे कारण संतोष आता आपल्यामध्ये नाही. संतोष भावा तुला मी खूप मिस करत आहे.
लोक गेल्यावरच खांद्यावर आधी कोणी येत नाही, असं सुरज चव्हाणने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सुरजने त्याच्यासोबतचे काही रील्स देखील शेयर केले आहेत. सुरजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचे रील्स शेयर केला आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली वाघा, आता परत कधी येशील, असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. दोघांनी मैत्री सर्वाना चांगली माहिती होती. इतर टिकटॉक स्टार्ससारखा संतोष मॉडेल किंवा डान्सर असा काही नव्हता. त्याचे रील्स पाहिले तर तो ग्रामीण भाषेमध्ये खूपच सध्या पद्धतीने रील्स बनवत होता, यामधूनच त्याला प्रसिद्धी मिळाली होती.
संतोषचे इन्स्टावर दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. यातील काही व्हिडीओला मिलियन्समध्ये व्हूज आले आहेत. संतोषचा मित्र सुरज चव्हाणचे सोशल मिडियावर सहा लाखांच्यावर फॉलोवर्स आहेत. बाहेर गेल्यावर अनेक ठिकाणी संतोष मुंडेचा सत्कार केला जात होता.