प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंडेसोबत बाबुराव मुंडे या दोन तरुणांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना भोगलवाडी येथे मंगळवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हाल हळहळ व्यक्त केली जात आहे.
संतोष मुंडेच्या चाहत्यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. धारूर तालुक्यातील भोगलवाडी ते काळेची वाडी येथे हि घटना घडली. संतोष मुंडे आणि त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे विजेच्या डीपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना अचानक शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परीसरामध्ये शोककळा पसरली. अनेक माध्यमांमधून दु:ख व्यक्त केले जात आहे. संतोष मुंडेने टिक टॉकच्या माध्यमातून चांगली लोकप्रियता मिळवली होती. सोशल मिडियावर त्याचा मोठा चाहता वारघ आहे.
त्याच्या अशा अकाली निधनामुळे चाहते देखील हळहळ व्यक्त करत आहेत. जन्मताच बोबडा असलेला संतोषच्या घरची परिस्थिती प्रतिकूल होती. टिक टॉकच्या माध्यमातून तो रातोरात स्टार झाला होता. संतोषचा भोळेपणा, भाबडेपणा व्हिडीओ बनवण्याची वेगळी शैली यामुळे तो अल्पावधीमध्येच लोकप्रिय झाला होत. ओ हो बायको लयच मरती ओ हा त्याचा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता.
संतोषने काही वेबसिरीजमध्ये देखील काम केले होते. त्याच्या बोबडेपणाचा त्याने खूपच चांगल्या प्रकारे वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. संतोषच्या अकाली मृत्यूने सोशल मिडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.