छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा हि सिरीयल दर्शकांच्या आवडीच्या सिरियल्सपैकी एक आहे. सिरीयलमधील तारक मेहताची भूमिका करणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.

शैलेश लोढा यांनी सिरीयल सोडल्याची बातमी येताच दर्शकांना मोठा धक्का बसला होता. त्यात भरीस भर आता आणखी एक कलाकार तारक मेहता का उल्टा चष्मा सिरीयल सोडणार असल्याची बातमी समोर आली आहे.

‘तारक मेहता…’ सिरीयलमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या काही दिवसांपासून सिरीयलमध्ये पाहायला मिळत नाहीय. त्यामुळे आता अशा चर्चा होत आहेत कि अभिनेता राज अनादकट मालिकेचा निरोप घेणार आहे. आता हे कितपत तथ्य आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

‘तारक मेहता…’ या सिरीयलमधील अनेक कलाकारांनी याआधीच या सिरीयलला रामराम ठोकला आहे. सोढीची भूमिका करणारा गुरचरण सिंग, बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदौरिया, अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता त्याचबरोबर सोनूच्या भूमिकेतील २ अभिनेत्रींनी देखील हि सिरीयल सोडली आहे. विशेष म्हणजे सर्वात पहिले टप्पूची भूमिका करणाऱ्या भव्य गांधीने देखील हि सिरीयल सोडली आहे.

कलाकारांनी सिरीयल सोडल्याच्या बातम्या समोर येत असतानाचा दयाबेन सिरीयलमध्ये परत येणार असल्याची बातमी सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. पण सगळ्यांची लाडकी दिशा वकानी आपल्याला या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार नसून दुसरी अभिनेत्री त्याजागी येणार आहे.