या आहेत आठ हिंदू विवाह पद्धती !

By Viraltm Team

Updated on:

हिंदू शास्त्रानुसार विवाहाच्याआठ विविध पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील पाच विवाह पद्धतींना खूप अशुभ मानले जाते. ब्रह्म, देव, राक्षस, पिशाच्च, आर्श, गंधर्व, प्राजापत्य ही आठ प्रकारच्या विवाहांची नावे आहेत. या आठ विवाह पद्धतींमध्ये ब्रह्म विवाहास सर्वात शुभ मानले जाते. या आठ विवाह पद्धती कोणत्या व त्यांची खासियत काय हे आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

1. ब्रह्म विवाह
आच्छाद्य चार्चयित्वा च श्रुतिशीलवते स्वयम् ।
आहूय दानं कन्याया ब्राह्मो धर्मः प्रकीर्तितः ॥
या श्लोकाचा अर्थ – ब्रह्म विवाह हा दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने केला जातो. या विवाहात मुलीची इच्छा असेल तर मुलीचे कुटुंब मुलाकडच्या कुटुंबीयांना लग्नासाठी प्रस्ताव देतात. हा विवाह पूर्णतः हा विधिवत संपन्न होतो. ब्रह्म विवाह पद्धत हे इतर विवाह पद्धतींमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते.

2. देव विवाह
यज्ञे तु वितते सम्यगृत्विजे कर्म कुर्वते ।
अलङ्कृत्य सुतादानं दैवं धर्मं प्रचक्षते ॥
यश लोकांमध्ये देव विवाह काय असतो याचा अर्थ सांगितला आहे. या विवाहात ऋत्विजला वर मानतात. विवाह वधूपक्षाकडून आभूषणे देऊन मुलीचा हात देतात. या प्रकारच्या विवाहास देव विवाह असे संबोधले जाते.

3. आर्श विवाह
एकं गोमिथुनं द्वे वा वरादादाय धर्मतः ।
कन्याप्रदानं विधिवदार्षो धर्मः सः उच्यते ॥
या विवाह पद्धतीत वर पक्षाकडून वधू पक्षास आभूषणे व गाय आणि बहीण भेट म्हणून दिल्या जातात. भेटवस्तू मिळाल्यानंतर कन्येचा विवाह विधिवत केला जातो. पूर्वीपासून माणसाचे आयुष्य हे शेतीवर आधारलेले असे त्यामुळे भेटवस्तू च्या स्वरूपात गाय-बैल देण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर आर्ष विवाह पद्धतीत मुलीची किंमत भेटवस्तू घेऊन केली जाते आणि तिचा विवाह लावला जातो.

4. प्रजापत्य विवाह
सहोभौ चरतां धर्ममिति वाचाऽनुभाष्य च ।
कन्याप्रदानमभ्यर्च्य प्राजापत्यो विधि स्मृतः ॥
हा विवाह मुलीचे आई-वडील ठरवतात. यामध्ये मुलीची इच्छा काय आहे हे विचारले जात नाही. हा विवाह धनवान व प्रतिष्ठित पुरुषासोबत लावला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पैशाच्या लालसेपोटी आई वडील त्यांच्या मुलीचा विवाह एखाद्या श्रीमंत व्यक्तीशी लावून देतात.

5. गंधर्व विवाह
इच्छयाऽअन्योन्यसंयोगः कन्यायाश्च वरस्य च ।
गांधर्वः स तु विज्ञेयो मैथुन्यः कामसम्भवः ॥
या प्रकारचे विवाहास प्रेमविवाह देखील म्हणतात. या विवाह प्रकारात वधू आणि वर त्यांच्या कुटुंबाच्या संमतीशिवाय एकत्र राहतात व कोणताही रितीरिवाज न पाळता लग्न करतात. अशा प्रकारच्या विवाहास वधू-वरांच्या कुटुंबीयांकडून सहजासहजी परवानगी मिळत नाही. राजा दुष्यंत आणि शकुंतला हिने गांधर्व विवाह केला होता असे पौराणिक कथांमध्ये सांगितले आहे.
6. असुर विवाह
ज्ञातिभ्यो द्रविणं दत्त्वा कन्यायै चैव शक्तितः ।
कन्याप्रदानं स्वाच्छन्द्यादासुरो धर्म उच्यते ॥
या विवाह पद्धती मुलीला खरेदी केले जाते आणि तिच्याशी लग्न केले जाते त्यास असुर विवाह पद्धत असे म्हणतात. आजही भारतातील अनेक दुर्गम भागात पैशांसाठी आई-वडील मुलीला विकतात आणि तिचे लग्न लावून देतात.
7. राक्षस विवाह
हत्वा छित्वा च भित्वा च क्रोशन्तीं रुदन्तीं गृहात् ।
प्रसह्य कन्याहरणं राक्षसो विधिरुच्यते ॥
या विवाह पध्दतीत मुलीचे अपहरण करून तिच्या सोबत जबरदस्ती लग्न केले जाते. पूर्वी राजा महाराजांच्या काळात युद्ध हरल्यावर जिंकलेला राजा हरलेल्या राजांच्या पत्नीशी किंवा मुलींशी त्यांचे अपहरण करून जबरदस्ती त्यांच्या सोबत लग्न करीत असे. या पद्धतीस राक्षस विवाह पद्धत असे म्हटले जाते.

8. पिशाच्च विवाह पद्धत
सुप्तां मत्तां प्रमत्तां वा रहो यत्रोपगच्छति ।
सः पापिष्ठो विवाहानां पैशाचश्चाष्टमो९धमः।|
या विवाह पद्धतीत मुली सोबत शारीरिक संबंध ठेवल्या नंतर तिच्याशी विवाह केला जातो. काहीवेळेस या विवाह पद्धती मुलीच्या कुटुंबीयांची हत्या देखील केली जाते. पूर्ण आठ विवाह पद्धतींमध्ये ही सगळ्यात क्रूर विवाह पद्धत मानली जाते.
वरील आठ विवाह पद्धतीने मधील आता बरेच या विवाह पद्धती संपुष्टात आल्या असून त्यातील काही चांगल्या विवाह पद्धतीचा आता अवलंबल्या जातात.

Leave a Comment