तेजस्विनी पंडितचे मुलाखतीदरम्यानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाली; ‘माझ्यात खूपच…’

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये असते. चित्रपट, सिरीयल किंवा वेब सिरीज असो तेजस्विनी आपल्या हटके भूमिकांमुळे नेहमीच दर्शकांच्या मनामध्ये घर करते. अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या बळावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

तेजस्विनी पंडितच्या प्रत्येक भुमिकेचे दर्शकांकडून नेहमीच कौतुक झाले. आता अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रामध्ये देखील पदार्पण केले आहे. प्लॅनेट मराठीवरील ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अथांग या वेब सिरीजमुळे ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे.

नुकतेच अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केलेले वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे. मुलाखतीदरम्यान तिने निर्मिती क्षेत्रामध्ये आल्यावर तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले. याशिवाय मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्याबद्दल जे गैरसमज पसरले आहेत त्यावर देखील तिने भाष्य केले.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्मात्यांकडून कलाकारांना वेळेवर मानधन मिळत नसल्याचे तिने अनेकवेळा ऐकले होते. तेव्हा अभिनेत्रीने यावर उत्तर दिले आणि म्हणाली कि मला लोक खूपच माजोरडी असल्याचे म्हणतात. ती पुढे म्हणाली कि माझ्यामध्ये प्रचंड माज आहे असे लोक म्हणतात पण अस असल तरी माझ्यासोबत जी व्यक्ती काम करते ती असे कधीच म्हणणार नाही.

त्यांना माहिती आहे कि मी माजोरडी नाही. शिवाय माझ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मी वेळेवर मानधन दिले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. अगं बाई अरेच्चा चित्रपटामधून तिने अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले होते. तिने साकारलेल्या सिंधुताई सपकाळ या भुमिकेचे दर्शकांमधून विशेष कौतु झाले. नुकतेच अभिनेत्री अथांग वेब सिरीजची निर्मित केली आहे. यामध्ये तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonnal Jagtap (@sonal_jagtap1988)

Leave a Comment