मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक सिरियल्स, वेब विरीज आणि चित्रपटांमधून अभिनेत्रीने दर्शकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री आता निर्मित क्षेत्रामध्ये देखील उतरली आहे. सत्य ती तिच्या अथांग या वेब सिरीजमुळे खूप चर्चेमध्ये आहे. या निमित्ताने तिने अनेक खुलासे केले आहेत.
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची अथांग हि वेब सिरीज नुकतेच रिलीज झाली आहे. या वेब सिरीजची निर्मिती तेजस्विनीने केली आहे. यामध्ये ती कोणत्याही भूमिकेमध्ये पाहायला मिळालेली नाही. पण अभिनेत्रीने पडद्यामागे अनेक भूमिकांची जबाबदारी घेतली आहे. नुकतेच अभिनेत्री एका मुलाखतीमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.
मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमधील गटबाजीबद्दल वक्तव्य केले आहे. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये गटबाजी आहे हे तर सर्वांना चांगलेच माहिती आहे. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आता असा प्रकार सुरु झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून मी काही निवडक लोकांसोबतच काम करत आहे अशी माझ्यावर टीका होऊ लागली आहे.
काही दिवसांपूर्वी मी संजय जाधव यांच्यासोबत काम केले होते. पण दिग्दर्शकांना त्यांच्या ठरलेल्या कलाकरांसोबत काम करायला खूपच सोपे जाते असे देखील ती म्हणाली. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गटबाजी दिसून येते का असे विचारल्यानंतर अभिनेत्री म्हणाली कि, नागराज मंजुळे त्याच्या चित्रपटांमध्ये आकाश ठोसरला घेतोच कि, असे नाही कि फक्त संजय जाधव असे करतात. प्रत्येकाचा ग्रुप वेगळा असतो.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित अनेक चित्रपट सिरीयल आणि वेब सिरीजमध्ये पाहायला मिळाली आहे. तिने अगं बाई अरेच्चा चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती. आता नुकतेच तिने निर्मिती क्षेत्रामध्ये देखील आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. अथांग वेब सिरीज हि तिची पहिली निर्मिती आहे. यामध्ये तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. वेब सिरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram