छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा हि सिरीयल प्रसिद्ध सिरियल्सपैकी एक आहे. या सिरीयलने दर्शकांच्या मनामध्ये घर केले आहे. सिरीयलमधील जेठालाल आणि दयाबेन या जोडीने तर घराघरामध्ये प्रसिद्धी मिळवली. सिरीयलमधील तारक मेहताची पत्नी अंजली भाभी देखील नेहमीच चर्चेमध्ये पाहायला मिळते.
अंजली भाभीजी भूमिका अभिनेत्री नेहा मेहताने साकारली होती. पण काही वर्षांपूर्वी तिने हि सिरीयल सोडली. दरम्यान सिरीयल सोडल्याच्या तब्बल २ वर्षांनंतर अभिनेत्रीने निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहाने २०२० मध्ये सिरीयलला रामराम ठोकला होता.
तिने तब्बल १२ वर्षे या सिरीयलमध्ये काम केले. यानंतर आता दोन वर्षांनी नेहाने मालिकेमधील आपल्या भूमिकेबद्दल आरोप लावले आहेत. नेहा म्हणाली कि मी २०२० मध्ये सिरीयल सोडली, हा शो म्हणजे माझ्या कुटुंबाचाच एक भाग होता. त्यामुळे काहीही न बोलता शो सोडला होता. पण आता शांत बसणार नाही. शो सोडून दोन वर्षे उलटली तरी मला माझे थकीत मानधन अजूनदेखील मिळालेले नाही. निर्मात्यांना मी अनेकवेळा फोन केला पण मला काहीच उत्तर भेटले नाही.
निर्मात्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले कि नेहा हि या सिरीयलचा एक भाग राहिली आहे. अनेक वर्षे तिने सिरीयलमध्ये काम केले पण काहीही न सांगता तिने हि सिरीयल सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी तिला अनेक मेल देखील केले गेले पण तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने कोणत्याच कागदांवर स्वाक्षरी केली नाही. अनेकवेळा आम्ही तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी मेलचे उत्तर दिले असते तर अधिक बरे झाले असते.
नेहा २००४ मध्ये रात होने को हैं आणि देस में निकला होगा चांद या सिरीयलमध्ये देखील काम करताना पाहायला मिळाली होती. त्यापूर्वी तिने २००१ मध्ये गुजराती आणि २००३ साली धाम या तेलगु चित्रपटामध्ये काम केले होते. सध्या तारक मेहतामध्ये सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे.