चाहत्यांची चिंता वाढली ‘या’ दिग्गज अभिनेत्याला रुग्णालयात केले भरती, काही दिवसात चित्रपट होणार आहे रिलीज…

By Viraltm Team

Published on:

कन्नड़ स्टार किच्चा सुदीप गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट विक्रांत रोना २८ जुलैला रिलीज होणार आहे. याअगोदरच्या अभिनेता किच्चा सुदीपबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आरोग्याविषयी मोठ्या बातम्या समोर आहेत. त्यामध्येच आता किच्चा सुदीप को रो ना च्या विळख्यात सापडला आहे.

सुदीपबद्दलच्या नवीन माहितीनुसार तो त्याचा आगामी चित्रपट विक्रांत रोनाचे प्रमोशन कदाचित करू शकेल. अभिनेता काही दिवस खूपच अस्वस्थ होता, यानंतर त्याने आपली कोविड-१९ चाचणी करून घेतली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला आहे. तो काही दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये देखील भरती झाला होता, आता तो घरी परत आला आहे, पण त्याला अजून आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

किच्चा सुदीप साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. अजय देवगणसोबत झालेल्या भाषेच्या वादामुळे तो प्रकाशझोतात आला होता. सुदीपने हिंदी आणि राष्ट्रीय भाषेच्या स्थितीबद्दल काजोलचा पती आणि दृश्यम स्टार अजय देवगणसोबत वाद घातला होता. यावर्षी एप्रिलमध्ये सुदीपने एका कार्यक्रमामध्ये म्हंटले होते कि आता भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाही, अजयने ट्विटरवर त्याच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना एक लांबलचक नोट लिहिली होती आणि सुदीपला टॅगही देखील केले होते.

यानंतर दोन्ही अभिनेत्यांमध्ये इंटरनेटवर जोरदार भांडण झाले होते. नुकतेच मिडियामध्ये याबद्दल बोलताना किच्चा सुदीपने दावा केला आहे कि दोन्ही अभिनेत्यांनी सर्व भूतकाळ सोडून दिला आहे. किच्चा सुदीप आपल्या आगामी विक्रांत रोनाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

२ सप्टेंबर १९७१ मध्ये जन्मलेल्या किच्चा सुदीपने फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. थयव्वा चित्रपटामधून त्याने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली होती. तर २००८ मध्ये त्याने फूंक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. सलमानच्या दबंग ३ चित्रपटामध्ये देखील तो दिसला होता.

Leave a Comment