तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गीतकार कबीलनची मुलगी थूरिगाईचे निधन झाले आहे. असे म्हंटले जात आहे कि तिने आ’त्म ह’त्या केली आहे. माहितीनुसार शुक्रवारी थूरिगाई राहत्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी थुरिगाईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
असे म्हंटले जात आहे कि थूरिगाई खूपच स्ट्राँग महिला होती. अशामध्ये तिच्या आत्महत्येमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवाई ती तिच्या खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी थूरिगाईचा मोबाईल जप्त केला आहे. यासोबत कुटुंबीयांची चौकशी करून आत्महत्येचे नेमके कारण शोधले जात आहे.असा दावा केला जात आहे कि
थूरिगाई डिप्रेशनमध्ये होती. कारण तिचे आई-वडील तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होते. थूरिगाईचे कोणावरतरी प्रेम होते आणि तिच्या आईवडिलांना हे नाते मंजूर नव्हते. थूरिगाई चेन्नईच्या अरुमबक्कम भागामध्ये राहत होती. ती व्यवसायाने कॉस्च्युम डिझायनर आणि लेखिका होती.
दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये तिने स्वतःचे मासिक बीइंग वुमन लाँच केले होते. या लाँचिंग इवेंटमध्ये दिग्दर्शक पीए. रंजीत, चेरान आणि अभिनेत्री विमला रमन देखील सामील झाले होते. तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये थूरिगाईने जीवी प्रकाश कुमार आणि अशोक सेल्वन सारख्या अभिनेत्यांसाठी कॉस्टयूम डिझाईन केले होते.
थूरिगाईच्या वडिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी रजनीकांत, विजय, अजीत आणि विक्रम सारख्या अभिनेत्यांसाठी गाणी लिहिली आहेत. ४५ वर्षाचे कबीलन हे मुळचे पाँडिचेरीचे राहणारे आहेत. त्यांनी २००० मध्ये टीव्ही शोज आणि चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून देखील काम केले.