सोनाली फोगाटचे नुकतेच गोव्यामध्ये निधन झाले. सोशल मिडियावर सोनाली क्वीन होती, नंतर तिने राजकारणामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये गेल्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणूक देखील लढवली. तथापि ती हारली. असो ती आपल्या पाठीमागे काय काय सोडून गेली, तिचे करियर कसे सुरु झाले, तिचे नेटवर्थ किती होते जाणून घेऊया.
सोनाली फोगाटचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणामध्ये फतेहाबादच्या भुथन गावामध्ये झाला होता. ती शेतकरी कुटुंबामधून होती, तिचे लग्न तिच्या बहिणीच्या दिरासोबत झाले होते.. दोघांना एक मुलगी आहे जिचे नाव यशोधरा फोगाट आहे.
सोनालीने आपल्या करियरची सुरुवात दूरदर्शन हिसारवरून एक टीव्ही अँकर म्हणून म्हणून सुरु केले होते. नंतर झी टीव्हीच्या अम्मा नाम रके सिरीयलमध्ये ती दिसली होती. यानंतर तिने टिकटॉकवर डांस व्हिडीओ बनायला सुरुवात केली आणि ती खूपच फेमस झाली.
सोनालीचे पती संजय फोगाट भाजपाचे नेते होते, त्यांचा मृत्यू २०१६ मध्ये झाला होता. सोनाली फोगाटने बिग बॉस १५ मध्ये याचा उल्लेख केला होता, तिच्या पतीचा मृतदेह हरियाणाच्या एका फार्म हाउसमध्ये मिळाला होता, तथापि हत्या कोणी केली याची माहिती मिळाली नाही.
त्यावेळी ती मुंबईमध्ये राहत होती, तिला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिला अभिनय, राजकारण सर्व काही सोडायचे होते, पण तिच्या सासूने तिला असे करण्यास रोखले, पुढे जाण्याची हिम्मत दिली, सोनालीने सांगितले कि तिच्या सासूने तिला मोटिवेट केले होते. संजयने तिच्यासाठी जे स्वप्न पाहिले होते त्याला पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.
सोनाली फोगाट राजकारणामधून तर कमवत होतीच शिवाय म्युझिक व्हिडीओ आणि इंस्टाग्राम वरून देखील देखील चांगली कमाई करत होती. तिच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाले तर ती जवळ जवळ ४.६ करोड रुपये संपत्तीची मालकीण होती. तिने बिग बॉस १५ मध्ये एका आठवड्यासाठी ८० हजार रुपये चार्ज केले होते, याशिवाय ती चित्रपटासाठी २०-२५ लाख रुपये फी घायची. तिच्याजवळ महिंद्राची एक एक्सयूवी कार आहे.