मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या विवाहामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने लंडनमध्ये लग्न केले होते. प्लॅनेट मराठी या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर तिच्या लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. दरम्यान तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले होते.
दरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. सोनालीच्या आजीचे निधन झाले आहे. सोनाली कुलकर्णीची आजी सुशीला कुलकर्णी यांनी या जगामधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने रविवारी दुपारी हि दु:खद बातमी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केली आहे.
सोनालीने माहिती शेयर करताना तिच्या आजीसोबतचा एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओ शेयर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि आजी तू आमच्यासोबत नेहमीची राहशील, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत, सोनालीच्या या वक्तव्यावरून हे समजते कि ती आजीच्या किती जवळची होती.
व्हिडीओमध्ये सोनाली आजीसोबत डांस करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचा एक बालपणीचा सुंदर फोटोदेखील व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे. सोनालीने पोस्ट शेयर केल्यानंतर चाहते तिच्या दु:खामध्ये सहभागी होत तिच्या आजीला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सोनालीने २०२१ मध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले होते. लॉकडाऊन काळात दुबईत रजिस्टर मॅरेज करत दोघे लग्नबेडीत अडकले होते. लग्नामध्ये सोनालीचे कुटुंब सहभागी होऊ शकले नव्हते त्यामुळे यावर्षी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोनाली आणि कुणाल यांनी लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्न केले होते.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram