गेल्या काही दिवसांपासून टीव्ही इंडस्ट्रीमधून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. नुकतेच ऑन-एअर टीव्ही शो अली बाबा दास्तान-ए-काबुल सिरीयलची मुख्य अभिनेत्री २० वर्षीय तुनिशा शर्माने सेटवर मृत्यूला कवटाळले आहे. २४ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या या घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसात २६ डिसेंबर २०२२ रोजी हि बातमी समोर आली आहे कि एका प्रसिध्द सोशल मिडिया स्टारने मृत्यूला कवटाळले आहे. तिचे वय अवघे २२ वर्षे होते. इंस्टाग्रामवर फेमस असण्यासोबत ती एक युट्यूब चॅनल देखील चालवत होती.
तुनिशा शर्माने नंतर ज्या स्टारने आ त्मह त्या केली आहे तिचे नाव लीना नागवंशी असे आहे. लीना २२ वर्षाची एक प्रसिध्द इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि एक युट्यूब चॅनल होस्ट होती. लीना छत्तीसगढ़ बेस्ड होती. लीनाचा मृत्यूचे प्रकरणही सध्या आत्महत्येकडे इशारा करत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार लीना नागवंशीचा मृत्यू सोमवारी म्हणजे २६ डिसेंबर २०२२ रोजी झाला. माहितीनुसार लीनाची आई मार्केटला गेली होती आणि लीना घरी होती. जेव्हा ती घरी परत आली तेव्हा लीना तिच्या खोलीमध्ये नव्हती संपूर्ण घरामध्ये शोधल्यानंतर लीनाची आई जेव्हा छतावर गेली तेव्हा छताचा दरवाजा बंद होता.
लीनाच्या आईने जेव्हा छताचा दरवाजा थोडा जोर लावून उघडला तेव्हा तिला लीनाचा मृ तदे ह मिळाला. पोलिसांनी लीनाचा मृ तदे ह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांना कोणतीही सु सा इ ड नोट मिळालेली नाही.