एसएस राजामौलीचा बाहुबली चित्रपट पार्ट १ आणि पार्ट २ ब्लॉकबस्टर ठरले होते. या चित्रपटामधील प्रत्येक भूमिकेला पसंद केले गेले होते. यामधील एक भूमिका होती शिवगामी जी अभिनेत्री राम्या कृष्णनने साकारली होती. राम्याचा अभिनय आणि व्यक्तिरेखा दोन्हीही दर्शकांना खूप आवडली होती. नुकतेच राम्याने आपला वाढदिवस साजरा केला आहे.
राम्या कृष्णनचा जन्म १५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नईमध्ये झाला होता. राम्याने साउथसोबत बॉलीवूडमध्ये देखील काम केले आहे. राम्या कृष्णनसाठी बाहुबली चित्रपट खूपच लकी ठरला होता. या चित्रपटामुळे तिला जगभरामध्ये ओळख मिळाली होती.
पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि राम्या या भूमिकेसाठी पहिली निवड नव्हती. हि भूमिका बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीलाला ऑफर करण्यात आली होती. श्रीदेवीने यासाठी इतकी मोठी फीस मागितली होती कि निर्मात्यांनी त्याला नकार दिला.
माहितीनुसार श्रीदेवीने तब्बल ६ करोड रुपये फीस मागितली होती. बाहुबली चित्रपटाचे बजट आधीच जास्त होते, ज्यामुळे दिग्दर्शकांनी याला आणखीन न वाढवण्याचा निर्णय घेऊन राम्याला या भूमिकेसाठी साईन करण्यात आले होते. हा चित्रपट राम्याच्या करियरसाठी मैलाचा दगड ठरला.
राम्याने आपल्या बॉलीवूड करियरची सुरुवात यश चोप्राच्या परंपरा चित्रपटामधून केली होती. यानंतर ती खलनायक, चाहत, बनारसी बाबू आणि बड़े मियां छोटे मियां सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. माहितीनुसार राम्याने आतापर्यंत २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.