संगीतसृष्टीला मोठा धक्का ! ‘या’ जेष्ठ संगीतकार आणि गायकाचे ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नि’ध’न…

By Viraltm Team

Published on:

शिवमोग्गा सुब्बन्ना सुगम संगीत म्हणजे लाइट म्युझिकच्या जगतामधील बादशाह होते. संगीतक्षेत्रामध्ये येण्यापूर्वी सुब्बना एक वकील म्हणून काम करत होते त्याचबरोबर नोटरी देखील होते. ८३ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे शिवमोगा सुब्बन्ना आपल्यामागे गाण्यांची अपार संपत्ती सोडून गेले.

कन्नड़ गायक शिवमोगा सुब्बन्ना यांचे रात्री उशिरा एका हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माहितीनुसार सुब्बन्ना शहरातील जयदेव हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्यामागे त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी एस. भाग्यश्री द हिंदू कर्नाटकची निवासी संपादक आहे.

शिवमोगा सुब्बन्नाने अवॉर्ड विजेत्यांच्या कवितांना आपले संगीत दिले आणि आपल्या अंदाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचवले. सुब्बन्ना पहिले कन्नड़ भाषाचे प्लेबॅक सिंगर होते. ज्यांना १९७८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. हा पुरस्कार त्यांना काडू कुडुरे ओडी बानडिट्टासाठी मिळाला होता.

व्यवसायाने वकील असून द्केहील त्यांना संगीताची चांगली जान होती. प्रसिद्ध कवी वी पुट्टप्पा, दा रा बेंद्रे यांच्या कवितांसाठी आणि इतर कवितांसाठी देखील त्यांनी राग कंपोज केले. त्यांच्या कवितांना सुरेल पद्धतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. राष्ट्रीय पुरस्कार शिवाय त्यांना २००६ मध्ये कन्नड़ कंपू पुरस्कार देखील दिला गेला. कुवेंपु विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट देखील मिळाली आहे.

त्यांच्या चाहत्यांनी आज देखील त्यांचा आवाज आपल्या फोनमध्ये संचित करून ठेवला आहे. जेव्हा देखील त्यांना शिवमोगा सुब्बन्ना यांची आठवण येईल तेव्हा ते त्यांचा आवाज ऐकतील. हेच त्यांनी आयुष्यभर कमवले आणि हेच त्याची जनतेमध्ये सोडून या जगाचा निरोप घेतला.

Leave a Comment