आपल्या आयुष्यामधील दुःख आणि समस्यांपासून सुटका मिळवायची आहे, तर एकदा जरूर करा शनिदेवाचे हे ३ उपाय !

By Viraltm Team

Published on:

जीवनामध्ये सुख दुःखाचे येणे जाणे नेहमी चालू असते, नेहमीच म्हंटले जाते कि सुख आणि दु:ख हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत. जर एखाद्याच्या आयुष्यात फक्त सुखच असेल तर त्याला दु:खाबद्दल काहीच कळणार नाही आणि जेव्हा दु:ख येईल तेव्हा तो काय करेल. यासाठी जीवनामध्ये दु:खाचे येणे हे येणाऱ्या सुखाचे संकेत समजले जातात. ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये तणाव आणि निराशा भरून जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये अशा परिस्थितीमधून जात असाल तर आम्ही तुमच्यासाठी शनिदेवाचे काही उपाय घेऊन आलो आहोत. जे आपल्या आयुष्यामधील दुर्भाग्य दूर करण्यास मदत करू शकतात.

पहिला उपाय :- शनिवारच्या दिवशी हा उपाय करावा. यासाठी तुम्ही शनीदेवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दीपक लावावा आणि या दीपकामध्ये तिळाचे काही दाणे टाकावेत. यानंतर हात जोडून पुढे सांगितलेल्या मंत्राचा जप करावा. ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम: तुम्ही या मंत्राचा जाप ७ वेळा करावा आणि उच्चारणाच्या समाप्तीनंतर तुमची समस्या शनिदेवाच्या समोर व्यक्त करावी. ७ शनिवार पर्यंत हा उपाय केल्यास तुमची समस्या लवकरच सुटेल.दूसरा उपाय :- जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शत्रूंनी घेरलेले आहात, लोक तुमचे विरोधी आहेत, तर तुम्हाला हा उपाय करायला हवा. यासाठी तुम्ही एका काळ्या घोड्याची नाल घ्यावी, शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना एका काळ्या कपड्यावर हि नाल ठेवावी. पूजेनंतर शनिदेवासमोर आपली मनोकामना व्यक्त करावी. त्यानंतर ती नाल तिळाच्या तेलामध्ये बुडवावी आणि बाहेर यावे. यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर ती लावावी. यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश शकणार नाही आणि तुमचे शत्रूदेखील तुमच्यापासून दूर राहतील.तीसरा उपाय :- जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करत आहात आणि अनेक समस्यांचा सामना करत आहात, तर तुम्हाला हा उपाय करायला हवा. तुम्ही एक नारळ घ्या आणि त्यावर एक काळा धागा लपेटा. यानंतर शनिदेवाच्या समोर पूजेच्या मुद्रेमध्ये बसा आणि पुढे दिलेल्या मंत्राचा जाप करा. ॐ शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:। या मंत्राचा जाप ५१ वेळा करावा. यानंतर नारळावरील धागा खोलून तो आपल्या हातात बांधा आणि नारळ घरातील सदस्यांमध्ये प्रसाद म्हणून वाटा. हा धागा आपल्याला दुर्भाग्यातून वाचण्यास मदत करेल. हा उपाय तुम्ही ३-४ महिन्यातून एकदा करू शकता.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Comment