९० च्या दशकामधील कदाचित असे कोणी नसेल ज्यांनी दूरदर्शनवरील शक्तिमान शो पाहिला नसेल. शक्तिमान टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो होता आणि त्यामधील भूमिका देखील तितक्याच प्रसिद्ध होत्या. फक्त लहान मुलेच नाही तर त्यांचे आईवडील हा शो आवडीने पाहत असत.
त्यावेळी शक्तिमान असा एकमात्र सुपर हिरो होता जो शत्रूंचा नाश करून मुलांसाठी दरोज एक नवीन शिकवण देऊन जात होता. १९९७ मध्ये सुरु झालेला हा शो २००५ मध्ये जेव्हा बंद झाला तेव्हा लहान मुलांचे हृदय तुटले होते. पण आता हा शो मोठ्या पडद्यावर पुन्हा परत येत आहे.
शक्तिमान-गंगाधर (मुकेश खन्ना): मुकेश खन्नाने टीव्हीसोबत बॉलीवूडमध्ये खूप काम केला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विलेनची भूमिका साकारली आहे. पण त्यांना खरी ओळख हि शक्तिमान म्हणूनच मिळाली जी आज देखील कायम आहे.
महाभारतमध्ये भीष्म पितामहची भूमिका करून जेव्हा मुकेश खन्ना सुपर हिरो शक्तिमान बनला होता तेव्हा त्याला लहान मुलांकडून खूप प्रेम मिळाले होते. शक्तिमानमध्ये मुकेश खन्नाने दोन भूमिका केल्या होत्या एक म्हणजे शक्तिमान आणि दुसरी गंगाधर.
ज्यामधील एका भूमिकेमधून तो शत्रूंचा नाश करत होता तर गंगाधरची भूमिका करून तो लोकांना हसवायचे काम करत होता. लोक त्याच्या स्टाईल पासून त्याच्या अंदाजापर्यंत सर्व काही कॉपी करत होते. ज्याप्रकारे मुले मुकेश खन्नासाठी क्रेजी होते त्याचप्रकारे त्यांची क्रेज आज देखील पाहायला मिळते.
गीता विश्वास(वैष्णवी महांत): शक्तिमान शोमध्ये शक्तिमानची प्रेमिका म्हणून भूमिका केलेली गीता विश्वास उर्फ वैष्णवी महांतला देखील या शोमधून खूपच लोकप्रियता मिळाली होती. वैष्णवीने १९८८ मध्ये आलेल्या वीरांना चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. गीता विश्वासच्या सौंदर्यावर लोक अक्षरशः फिदा होते. आज गीता विश्वास उर्फ वैष्णवी ४७ वर्षाची झाली आहे आणि ती अजूनदेखील टीव्ही शोजमध्ये सक्रीय आहे.
डॉ जैकाल (ललित परमार): शोमध्ये शक्तिमानच्या विरुद्ध वेगवेगळी षड्यंत्रे रचणारा आणि एका शब्दामधून आपली ताकद दाखवणारा डॉ जैकालची भूमिका ललित परमारने केली होती. ललित परमारने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
शलाका(अश्विनी खलसेकर): शक्तिमान शोमध्ये शक्तिमानच्या शत्रूंची काहीच कमी नव्हती. त्याच्या मोठ्या शत्रूंमध्ये शलाका एक त्याची मोठी शत्रू होती. शलाकाची भूमिका अश्विनी खलसेकरने केली होती. जी एकता कपूर आणि रोहित शेट्टीच्या अनेक शोमध्ये पाहायला मिळाली आहे. शलाका उर्फ अश्विनी आज ५१ वर्षांची झाली आहे.
तमराज किलविश(सुरेन्द्र पाल): शक्तिमानचा खात्मा करण्याचा प्रयत्न करणारा तमराज किलविशची भूमिका सुरेंद्र पालने केली होती. भलेहि त्याची भूमिका निगेटिव्ह होती पण दर्शकांकडून त्याला खूप प्रेम मिळाले. त्याचा अंधेरा कायम रहे हा डायलॉग आज देखील लोकांच्या चांगलाच आठवणीत आहे. सुरेंद्र पाल ६८ वर्षाचा झाला आहे आणि तो टीव्ही आणि बॉलीवूडमध्ये काम करतो.
महागुरु (टॉम ऑल्टर): सुपरहिरो शोमध्ये टॉम ऑल्टरने महागुरूची भूमिका केली होती. टॉम ऑल्टरने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २९ सप्टेंबर २०१७ मध्ये टॉम ऑल्टरचे निधन झाले होते.
राजू श्रीवास्तव (धुरंधर सिंह): आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणारा कॉमेडियन राजू श्रीवास्तव देखील शक्तिमान शोचा भाग राहिला आहे. त्याने या शोमध्ये धुरंधर सिंहची भूमिका केली होती जो एक पत्रकार होता. शक्तिमान शो आता मोठ्या पडद्यावर परतणार आहे आणि शक्तिमानची भूमिका करण्यासाठी रणवीर सिंहला अप्रोच केले गेले आहे.