पृथ्वीतलावर मनुष्य हा खूप बुद्धिमान प्राणी आहे. आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर इतर सजीव प्राण्यांना आपला गुलाम बनवून आपल्या सुख सहीसाठी त्याचा वापर करत आहे. मनुष्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नवीन शोध लावून आपल्या भौतिक सुखसोयीसाठी त्याचा करून सर्व सुखसोयीने संप्पन झाला आहे. मनुष्याकडे प्रचंड अशी बुद्धिमत्ता आहे. परंतु प्रत्येक जण त्या बुद्धिमत्तेचा संपूर्ण वापर करत नाही. सामान्य लोक आपल्या बुद्धिमत्तेच्या फक्त २ ते ३ टक्केच वापर करतात. जे विद्वान असतात ते आपल्या बुद्धिमत्तेच्या ७ ते ८ टक्के इतकाच वापर करतात. यावरून आपण ओळखू शकतो की आपल्याकडे किती बुद्धिमत्ता आहे.ब्रेन गेम नेहमीच बुद्धीला चालना देत असतात. ब्रेन गेमने बुद्धी तल्लख होण्यासाठी मदत होते. गेम खेळायची गंमत अशी असते की एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण निर्माण होतो. सोशल मीडियावर अशा बुद्धीला चालना देणाऱ्या ब्रेन गेमला व फोटोला खूप पसंती मिळत असते. चॅलेंजिंग काम नेटिझन्स खूप आवडीने स्वीकारून ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर चॅलेंजिंग काम स्वीकारून ते सोडवण्याची स्पर्धा सुरू होत असते.
गेली तीन महिने झाले कोरोना व्हायरस मुळे लोक डाउन चालू आहे. त्यामुळे लोक घरी बसून खूप कंटाळलेले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर रोज नवीन नवीन फोटो चॅलेंजिंग फोटो व्हायरल होत आहेत. असाच एक सध्या सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे.
हा फोटो तुफान व्हायरल होण्यामागे कारणही तसंच खास आहे. सोशल मीडियावर या फोटोमध्ये पालापाचोळा असून त्यात एक विषारी साप लपलेला आहे. या फोटोमध्ये लपलेला विषारी साप शोधायचा आहे. हा लपलेला साप शोधायचं काम काही जणांसाठी टेन्शनच आहे तर काहीजण यासाठी विरंगुळा म्हणून साप शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.वरील फोटो हा हेलन हे ट्विटर अकाउंट वर शेअर करण्यात आला होता. हेलन ही सध्या पीएचडी करते आणि अजगराच्या वेगवेगळ्या जातीवर व प्रजातीवर अभ्यास करत आहे. हेलन ने जंगलामध्ये हा फोटो काढला असून या फोटोमध्ये पाला पाचोळ्यात तिला एक साप दिसला. पालापाचोळ्यात लपलेला साप पालापाचोळ्यात इतका एकरूप झालेला आहे की तो सहजासहजी दिसून येत नाही.
त्यामुळे हेलनने साप शोधण्याचं काम नेटिझन्स ला चॅलेंज स्वरूपात दिल आहे. हेलन ने दिलेले साप शोधण्याचे काम अनेकांना प्रयत्न करूनही जमलेले नाही. 100 पैकी काही मोजक्याच जणांना हे ओळखता आलं आहे. तुम्हीही प्रयत्न करा कदाचित तुमचा मेंदू तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही यात यशस्वी व्हाल. जर तूम्ही अपयशी ठरला तर आम्ही तुमचंही इतर नेटिझन्स प्रमाणे असच झाला असणार त्यामुळे याचं उत्तर आम्ही शोधून ठेवला आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.