मल्याळम रायटर सतीश बाबू पैय्यानूर संबंधी एक वाईट बातमी समोर आली आहे. गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. ५९ वर्षीय रायटर सतीश बाबू त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापहि समोर आलेले नाही.
सध्या पोलीस त्यांच्या आकस्मिक मृत्यूचा तपास करत आहेत. माहितीनुसार रायटरची पत्नी गुरुवारी रात्री तिच्या माहेरी गेली होती आणि सतीश बाबू फ्लॅटमध्ये एकटेच होते. जेव्हा रायटरने त्यांच्या पत्नीचा कॉल उचलला नाही तेव्हा ती घाबरली.
तर जवळच्यांचे म्हणणे आहे कि सतीश रात्री सात वाजल्यानंतर फ्लॅटच्या बाहेर दिसला नाही. ज्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली गेली. नंतर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला असता सतीश बाबू संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आले.
पतीला अशा अवस्थेमध्ये पाहून पत्नीचे भान हरपले. सध्या पोलीस त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. लघु कथाकार आणि उपन्यासकर सतीश बाबूचा जन्म १९६३ मध्ये पलक्कडच्या पाथिरिपाला येथे झाला होता.
त्यांनी कान्हांगड नेहरू कॉलेजमधून शिक्षण घेतले होते कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी कथा, कविता आणि निबंध लेखनाचे काम सुरु केले होते. आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांनी कालिकट युनिव्हर्सिटी च्या पहिल्या कँपस पेपर कँपस टाईम्सचे संपादन आणि प्रकाशन केले होते. त्यांच्या द्वारा लिहिल्या गेलेल्या उपन्यासमध्ये पेरामारम, फोटो, दैवपुरा, मांजा सूर्यते नालुकल, कुदामानिकल किलुंगु राविल सामील आहेत.