कोणी १७ करोडची साडी घालून नवरी बनले तर कोणी घातले तब्बल ९० करोडचे दागिने, हि आहेत साऊथ स्टार्सची सर्वात महागडी लग्ने…

By Viraltm Team

Published on:

७ फेब्रुवारी रोजी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे लग्न झाले झाले होते ज्याचे फोटो अजून देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. माहितीनुसार या रॉयल आणि रिसेप्शनमध्ये करोडो रुपये खर्च झाले. तथापि आज आपण साऊथच्या अशा रॉयल लग्नांमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च झाला.
या लिस्टमध्ये सर्वात पहिला नाव येते ते अभिनेता आणि राजनेता चिरंजीवीचा मुलगा आणि साऊथचा सुपरस्टार राम चरण तेजाचे. ज्याने २०१२ मध्ये आपल्या लहानपणीची मैत्रीण उपासना कामिनेनीसोबत लग्न केले होते. माहितीनुसार हे एक रॉयल लग्न होते.
भाजप नेते जी जनार्दन रेड्डीने मोठ्या धुमधडाक्यात आपली मुलगी ब्रह्माणीचे लग्न राजीव रेड्डीसोबत लावून दिले होते. लग्नाचे हे फंक्शन ५ दिवस चालले होते. ज्यामध्ये ५० हजार पेक्षा जास्त पाहुणे आले होते. माहितीनुसार ब्रह्माणीने १७ करोड रुपयांची सुंदर कांजीवरम साड़ी घातली होती. इतकेच नाही तर तिच्या दागिन्यांची किंमत तब्बल ९० करोड रुपये होती. तर लग्नाला तब्बल ५५० करोड खर्च आला होता.
साऊथ चित्रपटामधील प्रसिद्ध स्टार सूर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केले होते. माहितीनुसार ज्योतिकाच्या वेडिंग आउटफिटची किंमत ३ लाख रुपये होते. लग्नामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
या लिस्टमध्ये पुढचे नाव साऊथ सुपरस्टार जूनियर एनटीआरचे येते. त्याची पत्नी लक्ष्मी प्रसिद्ध व्यावसायिक श्री नार्ने श्रीनिवास रावची मुलगी आहे. माहितीनुसार लक्ष्मीच्या वेडिंग साड्यांवर तब्बल १ करोड रुपये खर्च करण्यात आला होता. इतकेच नाही तर लग्नाचा मंडप तयार करण्यासाठी १८ करोड रुपये खर्च आला होता. तर लग्नामध्ये जवळ जवळ १०० करोड रुपये खर्च झाले होते.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत रॉयल वेडिंग केले होते. दोघांनी माधापुरच्या हाईटेक्स ग्राउंड्सवर धुमधडाक्यात लग्न केले होते ज्याला सेलिब्रिटी वेडिंग फोटोग्राफर जोसेफ राधिक कॅप्चर केले होते. माहितीन्सुअर अल्लू अर्जुनच्या लग्नामध्ये ४० पेक्षा जास्त फोटोग्राफर हायर करण्यात आले होते. असे म्हंटले जाते कि लग्नाच्या दिवशी जवळ जवळ संपूर्ण हैद्राबाद जाम झाले होते.

Leave a Comment