साऊथच्या या अभिनेत्यांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, फोटोज पाहून तुम्ही देखील व्हाल त्यांच्यावर फिदा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार असे आहेत जे शानदार लाईफ जगतात. बॉलीवूड कलाकारांसारखेच साऊथचे कलाकार देखील शानदार लाईफ जगतात. गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट बॉलीवूड चित्रपटांना मात देत आहेत. साऊथच्या अभिनेत्यांच्या पत्नी खूपच कमी प्रमाणात चर्चेमध्ये असतात. आज आपण साऊथच्या काही अभिनेत्यांच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत.
महेश बाबू: साऊथचा सुपरस्टार महेश बाबू प्रसिध्द अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट येताच चित्रपटगृह हाऊसफुल होतात. महेश बाबूच्या पत्नीचे नाव नम्रता शिरोडकर आहे. नम्रता देखील एक अभिनेत्री आहे. महेश बाबू आणि नम्रता वामसी चित्रपटादरम्यान एकत्र आले होते. ज्यानंतर दोघांनी २००५ मध्ये लग्न केले.
नागार्जुन: साऊथचा सुपरस्टार अक्किनेकी नागार्जुनने दोनवेळा लग्न केले आहे. पण सध्या तो त्याची पत्नी अमला अक्किनेकीसोबत राहतो. अमला अक्किनेकी एक अभिनेत्री, भरतनाट्यम नृत्यांगना आणि पशु कल्याण कार्यकर्ता आहे. ती तमिळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिने काही कन्नड, मल्याळम आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
रामचरण: साऊथ अभिनेता रामचरणचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. रामचरणच्या पत्नीचे नाव उपासना कोनिडेला आहे. या कपलने २०१२ मध्ये लग्न केले होते. उपासना बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा देखील स्टनिंग दिसते. ती फिल्मी जगतापासून आणि लाइम लाइटपासूनही नेहमी दूर असते.
जूनियर एनटीआर: साउथचा अभिनेता सुपरस्टार जूनियर एनटीआरची पत्नी देखील खूपच सुंदर आहे. तिचे नाव लक्ष्मी प्रणति आहे. ती लाईटपासून दूर राहणेच पसंद करते. एनटीआर आधी फक्त साऊथच्या चित्रपटांमध्येच काम करत होता आणि तो खूप लोकप्रिय होता. पण आता जूनियर एनटीआर RRR चित्रपटामधून जगामध्ये फेमस झाला आहे.
अल्लू अर्जुन: पुष्पा चित्रपटामधील जबरदस्त अभिनयाने सम्पूर्ण देशामध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारा अभिनेता सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी देखील बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा खूप सुंदर आहे. अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत लग्न केले आहे. अल्लूने आपल्या मित्राच्या लग्नासाठी अमेरिकेला गेला होता, त्या लग्नामध्ये स्नेहा देखील आली होती. अर्जुनच्या मित्राने स्नेहा सोबत भेट घालून दिली, त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले.
विजय सेतुपति: विजय सेतुपति तमिळ चित्रपटामधील सर्वात व्यस्त अभिनेता आहे. विजय याच वर्षी रिलीज झालेल्या रजनीकांतच्या पेट्टा चित्रपटामध्ये दिसला होता. विजय सेतुपतिच्या पत्नीचे नाव जैस्सी सेतुपति आहे. दोघांनी २००३ मध्ये लग्न केले होते.
रवि तेजा: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील मास महाराजा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रवि तेजाने २६ मे २००२ रोजी कल्याणी सोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी मोक्षदाचा जन्म ६ जून २०१३ रोजी झाला होता तर छोट्या मुलाचे नाव मानित भूपतिराजू आहे.
सूर्या: अभिनेता, निर्माता आणि टीव्ही प्रेझेंटर सुर्या (सरावनन शिवकुमार) ने त्याची को-स्टार ज्योतिकासोबत लग्न केले आहे. अनेक वर्षे रिलेशनशिप राहिल्यानंतर २००६ मध्ये या कपलने लग्न केले होते. या दोघांना दोन मुले आहेत. (मुलगी दिया आणि मुलगा देव)

Leave a Comment