कोणी १०० करोड चार्ज करते तर कोणी ६० करोड, साऊथचे ‘हे’ दिग्गज अभिनेते एका चित्रपटासाठी घेतात इतके मानधन

By Viraltm Team

Published on:

साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री खासकरून तेलगु फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपट आज संपूर्ण जगावर राज्य करत आहेत. मग एसएस राजामौलीच्या डायरेक्शनमध्ये बनलेला प्रभासचा बाहुबली, जूनियर एनटीआर, राम चरणचा RRR असो किंवा सुकुमारच्या डायरेक्शनमध्ये बनलेला अल्लू अर्जुनचा पुष्पा : द राइज असो. खास गोष्ट हि आहे कि कधी काळी एका चित्रपटासाठी १५-१५ करोड रुपये चार्ज करणारे साऊथ इंडियन कलाकार आज १०० करोड किंवा १५० करोड रुपये इतकी तगडी फीस एका चित्रपटासाठी घेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

माहितीनुसार बाहुबली आणि साहो सारख्या चित्रपटांसाठी अभिनेता प्रभासने तब्बल १०० करोड रुपये इतके घसघशीत मानधन घेतले होते. प्रभाने त्याच्या आगामी आदिपुरुष चित्रपटासाठी तब्बल १५० करोड रुपये फीस घेतल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

RRR चित्रपटामधील मुख्य अभिनेता राम चरण एका चित्रपटासाठी ४५ करोड रुपये घेतो. राम चरण त्याचे वडील चिरंजीवीसोबत आचार्य चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाला होता. त्याच्या आगामी चित्रपट RC१५ लवकरच प्रदाशित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

पुष्पा : द राइज चित्रपटामधून जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या अल्लू अर्जुनने या चित्रपटाचा दुसरा पार्ट पुष्पा २ : द रूल चित्रपटासाठी ६० करोड रुपये पेक्षा जास्त फीस घेतल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाचे शुटींग ऑगस्ट महिन्यामध्ये सुरु करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jr NTR (@jrntr)

RRR चित्रपटामधील दुसरा मुख्य अभिनेता जूनियर एनटीआरला या चित्रपटासाठी ४५ करोड रुपये इतके मानधन मिळाले होते. जूनियर एनटीआरने नुकतेच आपल्या दोन प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे. यामध्ये एक प्रोजेक्ट कोराताला शिवासोबत असून दुसरा प्रोजेक्ट KGF फेम निर्देशक प्रशांत नीलसोबत करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Babu (@urstrulymahesh)

असा दावा केला जात आहे कि काही दिवसांपूर्वी बॉलीवूड मला अफॉर्ड करू शकणार नाही असे विधान करून वादामध्ये अडकलेल्या अभिनेता महेश बाबूने त्याचा नुकताच आलेला चित्रपट सरकारु वारी पाटा साठी ५५ करोड रुपये चार्ज केले होते. त्याने प्रोड्यूसर म्हणून देखील या चित्रपटाचे काम केले आहे. त्याचबरोबर नुकताच प्रदर्शित झालेला अदिवी शेष स्टारर मेजर चित्रपट देखील त्याने प्रोड्यूस केला आहे.

चिरंजीवीचा शेवटचा चित्रपट आचार्य होता. याची निर्मिती त्याचा मुलगा राम चरणनेच केली होती. यामुळे फीसबद्दल काही माहिती मिळाली नाही. पण असा अंदाज लावला जात आहे. चिरंजीवी एका चित्रपटासाठी ५० रुपये चार्ज करतो, जे चित्रपटाच्या मार्केट व्हॅल्यूवर देखील आधारित असते.

अयान मुखर्जीचा हिंदी चित्रपट ब्रम्हास्त्रमध्ये महत्वपूर्ण भूमिका करत असलेला नागार्जुन अक्किनेनी एका चित्रपटासाठी ७ करोड रुपये मानधन घेतो. नागार्जुन द घोस्ट चित्रपटाची देखील निर्मिती करत आहे जो पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील आणखी एक दिग्गज अभिनेता पवन कल्याणबद्दल असे म्हंटले जाते कि तो एका चित्रपटासाठी तब्बल ५० करोड रुपये चार्ज करतो. पवन कल्याणने त्याच्या हरि हर वीरा मल्लू चित्रपटासाठी ६० करोड रुपये चार्ज केले होते.

Leave a Comment