सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारणाऱ्या ‘साई पल्लवी’ने घेतला मोठा ‘निर्णय’, म्हणाली; यापुढे चित्रपटामध्ये लहान कपडे…

By Viraltm Team

Published on:

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर साउथ फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यात रश्मिका मंदाना, समंथा रुथ प्रभू आणि साई पल्लवी यासारख्या दिग्गज अभिनेत्री चर्चेमध्ये आल्या आहेत. सध्या अभिनेत्री साई पल्लवी तिच्या विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

विशेष म्हणजे अनेक अभिनेत्री या आपल्या बोल्डनेसमुळे आणि ग्लॅमरसमुळे चर्चेमध्ये राहतात पण साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री साई पल्लवी एकटी अशी अभिनेत्री आहे जी नेहमी आपल्या साधेपणामुळे चर्चेमध्ये राहत असते.

अभिनेत्री साई पल्लवीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान एक मोठे विधान केले आहे. याआधी अभिनेत्री साई पल्लवी कोट्यवधी रुपयांची सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात नाकारल्यामुळे चर्चेमध्ये आली होती. पण यावेळी ती तिच्या विधानामुळे चर्चेमध्ये आली आहे.

साई पल्लवी नेहमी तिच्या साध्या वेशामुळे चर्चेमध्ये राहत असते त्यामुळे तिला मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला कि शॉर्ट ड्रेस का घालत नाही यावर तिने मोठे कारण सांगितले. साई पल्लवी म्हणाली, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. मला एक लहान बहिण आहे.

मी जेव्हा जॉर्डियामध्ये शिकत होते तेव्हा तिथे मी टँगो डान्स शिकले. या डांस प्रकारात एक विशिष्ट प्रकारचा पोशाख असतो. या कपड्यांविषयी मी माझ्या पालकांना विचारले तेव्हा त्यांनी मला ते कपडे घालण्याची परवानगी दिली. यादरम्यान मला प्रेमम चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माझा टँगो डांस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावर व्हिडीओवर अनेक अ श्ली’ल कमेंट आल्या होत्या ज्यामुळे मी लहान कपडे घालण्याचे सोडून दिले. अभिनेत्री साई पल्लवी साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अगदी लहान वयामध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमवले आहे.

Leave a Comment