गावातील मुलीचे एकामागून एक चौकार-षटकार पाहून इंप्रेस झाला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर…

By Viraltm Team

Published on:

क्रिकेटची आवड लोकांमध्ये प्रचंड आहे. ज्यामुळे सोशल मिडियावर व्हायरल होते देखील सामान्य झाले आहे. असाच बाड़मेरचा एक व्हिडीओ रातोरात व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये गावातील एक मुलगी अनुभवी खेळाडूप्रमाणे शॉट मारत आहे.

ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे. तसे तर हि मुलगी बाड़मेरच्या एक छोटे गाव शेरपुराची आहे. या मुलीने जेव्हा आयपीएल २०२३ ची लिलाव प्रक्रिया सुरु होती तेव्हा वाळवंटी भागामध्ये मोठे शॉट मारत स्वतःला सिद्ध केले आहे.

भारतामध्ये महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक दिवस १३ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला. जेव्हा पहिल्यांदा महिला प्रीमियर लीग (WPL) साठी लिलाव मोठ्या सफलतेने पार पडला. यामुळे देशामध्ये महिला क्रिकेटसाठी एक नवीन क्रांती आणली आहे. लिलावच्या दिवशी सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

ज्यामध्ये दिसत आहे कि एक गावातील मुलगी एकामागून एक चौकार-षटकाराचा पाऊस पाडत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि मुलगी चौफेर फटकेबाजी करत आहे आणि ती मुलांची चांगलीच धुलाई करता हे. या खेळीने सचिन तेंडुलकर देखील हैराण झाला आहे. क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा सचिन तेंडुलकरने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर केला आहे.

सचिनने ट्विट करत लिहिले आहे कि कालच लिलाव झाला आणि आज लगेच सामना सुरु झाला, वाह. तुझ्या फलंदाजीचा मी आनंद घेत आहे. सचिन तेंडुलकरने शेयर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. अने चाहते मुलीच्या फलंदाजीची तुलना सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीशी करत आहेत. इतकेच नाही तर सचिन तेंडुलकर देखील या मुलीच्या खेळाने प्रभावित झाला आहे.

Leave a Comment