जुळ्या बहिणींसोबत लग्न करणं तरुणाला पडलं महागात ! राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पोलिसांना निर्देश देत म्हणाल्या…

By Viraltm Team

Published on:

सोलापूर अकलूज मधील एक लग्न सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. अकलूजमध्ये दोन जुळ्या बहिणींसोबत एका तरुणाने नुकतेच लग्न केले आहे. पण या लग्नाची दाखल थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी सोलापूरच्या पोलिसांना चौकशी हे आदेश दिले आहेत.

२ डिसेंबर रोजी अकलूजमध्ये तरुणासोबत दोन बहिणी विवाहबद्ध झाल्या होत्या. या दोघी जुळ्या बहिणी कांदिवली मुंबई येथील राहणाऱ्या आहेत. दोघी आयटी इंजिनियर असून दोघीही मुंबईतच अंधेरीमध्ये एकाच आयटी कंपनीत नोकरी करतात. दोघींनी अतुल नावाच्या तरूणासोबत लग्न केले आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले.

रिंकी आणि पिंकी यांची आई आजारी पडल्यामुळे अतुल याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचबरोबर त्यांच्या आईची काळजी देखील घेतली होती. आईच्या आजारपणामध्ये अतुलने मोलाची मदत केली होती. घरामध्ये कोणी पुरुष नसल्यामुळे अतुल त्यांचा आधार बनला होता. अशामध्ये दोघी बहिणींपैकी एकटी त्याच्या प्रेमात पडली.

हि बाब दुसऱ्या बहिणीला समजल्यानंतर दोघींनी त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण दोघी बहिणींच्या सवयी एकसारख्या होत्या. आईने दोघी बहिणींचा भावना लक्षत घेऊन अतुलसोबत दोघींना लग्न करण्याची परवानगी दिली.

मात्र या लग्नाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु असताना आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या लग्नाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९४ प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलिसांनी चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान अतुलविरोधात याआधीच भारतीय दंडविधानाच्या कलम ४९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशमुख यांनी दिली आहे. अतुलचे बहुतेक नातेवाईक हे अकलूज भागामध्ये राहतात त्यामुळे हे लग्न अकलूजमधील गलांडे हॉटेलमध्ये झाले. या लग्नाचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अतुल सध्या खूपच अडचणीमध्ये आल्याचे दिसत आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment