सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ROYAL ENFIELD BULLET चे १९८६ चे बिल, त्यावेळची किंमत पाहून प्रत्येक बाईकप्रेमी आहे हैराण…

By Viraltm Team

Published on:

रॉयल एनफील्ड बुलेट ३५० भारतामधील सर्वात जुनी आणि लोकप्रिय बाईक पैकी एक आहे. काही ग्राहकांसास्ठी हि बाईक एक इमोशन देखील आहे. भारतीय बाजारामध्ये अनेक बाईक आल्या आणि गेल्या. पण रॉयल एनफील्ड बुलेट अनेक वर्षांपासून ३५० सीसी सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड टिकवून आहे. हि देशातील सर्वात महागड्या बाईकपैकी एक आहे. कंपनीची बुलेट ३५० ची ऑन-रोड किंमत सध्या १.८० लाख रुपये पर्यंत गेली आहे. पण सोशल मिडियावर या बाईकचे एक बिल व्हायरल होत आहे ज्यामध्ये बाईकची किंमत फक्त १८७०० रुपये आहे.

वास्तविक गेल्या काही वर्षांमध्ये बुलेट ३५० बाईकला थोडे अपडेट केले गेले आहे. पण याचे ओवरऑल डिझाइन पूर्वीसारखेच आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या किंमतीमध्ये झाला आहे. सोशल मिडियावर बुलेट ३५० चे १९८६ चे बिल समोर आले आहे. यामध्ये बाईकची किंमत फक्त १८७०० रुपये होती. हे बिल २३ जानेवारी १९८६ रोजी झारखंडच्या बोकारोमध्ये संदीप संदीप ऑटो कंपनी नावाच्या एका डीलरद्वारे जारी केले गेले होते.

हे बिल Royalenfield_4567k नावाच्या इंस्टाग्राम पेज वरून शेयर केले गेले आहे. हि पोस्ट काही मिनिटांमध्ये व्हायरल झाली. काही ऑनलाइन यूजर्स त्यावेळची किंमत पाहून हैराण झाले पण काहींनी म्हंटले कि जर घसरलेला रुपया आणि वाढती महागाई लक्षात घेता त्यावेळी देखील बाईक महाग होती.

एका युजरने लिहिले आहे कि मी नुकतेच हि बाईक २५०५०० रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि माझ्या आजोबांनी १९८४ मध्ये चेन्नईमध्ये २००० रुपयांना एक जमीन खरेदी केली होती. आता त्याची किंमत २ करोड आहे. एका युजरने तर हे लिहिले आहे कि हे बिल माझ्यापेक्षा देखील जुने आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Royal (@royalenfield_4567k)

Leave a Comment