वेड चित्रपटामधून सत्या आणि श्रावणीचे पुढे काय झाले? स्वतः रितेश देशमुखनेच केला खुलासा…

By Viraltm Team

Published on:

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा वेड चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. चित्रपटामध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच करोडो रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाने सध्या दर्शकांना अक्षरशः वेड लावले आहे. चित्रपटामध्ये सत्या आणि श्रावणीची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. निशाच्या अखंड प्रेमात बुडालेल्या सत्यासोबत श्रावणी लग्न करते. श्रावणीच्या निस्वार्थ प्रेमाची स्टोरी दर्शकांना खूपच भावली आहे.

पण चित्रपटाच्या शेवटला सत्या आणि श्रावणीचे पुढे काय झाले याबद्दल काही दाखवण्यात आलेले नाही. सत्य आणि श्रावणीचे पुढे काय झाले याचा प्रश्न दर्शकांना पडला होता याबद्दल खुलासा करत स्वतः रितेश देशमुखने एक व्हिडीओ शेयर केला आहे.

रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटामध्ये रितेशच्या मित्राची भूमिका करणारा अभिनेता शुभंकर तावडे देखील दिसत आहे. सत्या व श्रावणीचं पुढे काय झालं?” शुभंकरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रितेश म्हणाला कि दोघेही आता आनंदी आयुष्य जगत आहेत.

पण चित्रपटामध्ये सत्या आणि श्रावणीचे एक देखील रोमॅंटिक गाणं नसल्याची खंत शुभंकरने व्यक्ती केली. यावर रितेश म्हणाला कि रितेशने वेड चित्रपटामधील एका नवीन गाण्याची घोषणा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Leave a Comment