रितेश देशमुखने सांगितला अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाला; ‘अशोक मामांसोबत काम करणं म्हणजे…’

By Viraltm Team

Published on:

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा वेड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दर्शकांना चांगलेच वेड लावले आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नुकतेच एका मुलाखतीमध्ये दरम्यान शेयर केला आहे.

ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ हे गेली अनेक वर्षे आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनावर राज्य करत आले आहेत. अशोक मामांसोबत काम करण्याचे स्वप्न अनेक कलाकार पाहत असतात. रितेश देशमुखने देखील तेच स्वप्न पाहिले आणि आता अनेक वर्षांनंतर ते स्वप्न पूर्ण झाले आहे.

वेड चित्रपटामधून रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे. चित्रपटामध्ये त्याच्या वडिलांची भूमिका अशोक सराफ यांनी केली आहे. नुकतेच मुलाखतीदरम्यान अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव रितेश देशमुखने शेयर केला आहे.

सध्या रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांग्लाक व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो अशोक मामांबद्दल बोलताना दिसत आहे. रितेश म्हणतो कि अशोक मामांसोबत काम करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. मी गेली अनेक वर्षे याची वाट पाहत होतो. अखेर वीस वर्षांनी मला ती संधी मिळाली आहे.

चित्रपटामध्ये मी त्यांच्यासोबत अभिनय करतोय आणि चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करत आहे. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती असू शकत नाही. शिवाय रितेशने अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ देखील शेयर केला आहे.

दरम्यान वेड चित्रपटाला दर्शकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटामध्ये एका अठवड्यामध्ये १५ कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटामध्ये रितेश, जेनेलिया आणि अशोक सराफ यांच्याशिवाय शुभंकर तावडे, जिया शंकर यांनी देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्याचबरोबर सलमान खान चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून पाहायला मिळला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Leave a Comment