भारतीय टीम के स्टार क्रिकेटर रिषभ पंतच्या अपघात प्रकरणामध्ये एक नवीन मोठा खुलासा झाला आहे. हा खुलासा स्वतः पंतने केला आहे. अपघातानंतर जेव्हा पंतला रूडकीच्या सक्षम हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले तेव्हा पंतने सांगितले होते कि डुलकी लागल्याने कार डिव्हायडरला धडकली होती.
रूडकीनंतर रिषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पंतला भेटण्यासाठी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (डीडीसीए) एक टीमही येथे पोहोचली आहे. दरम्यान, ऋषभ पंतने डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांची भेट घेऊन नवा खुलासा केला आहे. श्याम शर्मा यांनी ही माहिती एजन्सीला दिली आहे.
श्याम शर्माने ऋषभ पंतची भेट घेतली तेव्हा त्याची प्रकृती जाणून घेतली, अपघात कसा झाला? याबद्दल देखील त्यांच्यामध्ये बातचीत झाली. पंत म्हणाला कि खड्डा समोर आल्याने चुकवण्याच्या नादात गाडीवरचा ताबा सुटला. ज्यामुळे हा अपघात झाला. वास्तविक श्याम शर्मा यांना विचारले गेले कि पंतने अपघाताचे कोणते कारण सांगितले. यावर डीडीसीएचे डायरेक्टर म्हणाले कि रात्रीची वेळ होती, समोर खड्डयासारखे काही आले होते त्यामधून वाचण्याच्या नादात हे सर्व घडले.
श्याम शर्माने सांगितले कि रिषभ पंतला सध्या एअरलिफ्ट करण्याची गरज नाही. त्याला सध्या दिल्लीला शिफ्ट केले जाणार नाही. लिगमेंट ट्रीटमेंटसाठी जर रिषभला लंडनला जावे लागले तर त्याचा निर्णय बीसीसीआई करेल. रिषभ पंतला कुठेही शिफ्ट करण्याचा निर्णय बीसीसीआई करेल. रिषभ पंतला थोड्या वेदना आहेत, पण तो सध्या हसतमुख आहे. बीसीसीआई सर्व डॉक्टरांच्या टचमध्ये आहे.
डीडीसीएचे सहसचिव राजन मनचंदा म्हणाले कि रिषभ पंतबद्दल जो रिपोर्ट आला आहे त्यानुसार त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. आम्हाला आशा आहे कि २ महिन्यांमध्ये तो मैदानावर असेल. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा ऋषभ पंतला भेटण्यासाठी डेहराडूनला पोहोचले असून बीसीसीआय ऋषभ पंतला सर्वोत्तम उपचार देत आहे.
रिषभ पंतला दुखापतीमुळे श्रीलंका विरुद्ध पुढच्या सिरीजसाठी निवडले गेले नव्हते. यानंतर तो आपल्या कारने रूडकीला जात होता. यादरम्यान त्याचा अपघात रूडकीच्या जवळ गुरुकुल नारसन भागामध्ये झाला.
पंत कारमध्ये एकता होता आणि स्वतः गाडी चालवत होता. अपघातानंतर पंतने सांगितले होते कि गाडी चालवताना त्याला झोप लागली आणि कार डिव्हायडरला धडकली आणि अपघात झाला. तो म्हणाला कि मी विंड स्क्रीन तोडून बाहेर आलो. यानंतर कारला आग लागली.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.