रवींद्र जडेजा मैदानावर त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा फिल्डिंग असो. रवींद्र एक असा व्यक्ती आहे जो नेहमी प्रश्नांची उत्तरे लवकर आणि विनम्रपणे देतो. तो त्याच्या लग्नामध्ये देखील आक्रमक होता. रवींद्र जडेजाच्या लग्नामध्ये गोळीबार देखील झाला होता ज्यामुळे पोलिसात तक्रार देखील झाली होती.
रवींद्र जडेजाच्या लग्नाच्या दरम्यान गोळीबार यामुळे झाला होता कारण तो एक राजपूत कुटुंबातून आहे. भारतामध्ये हे सामान्य आहे, जिथे लोक नेहमी लग्नामध्ये उत्साहाच्या भरात गोळीबार करतात. रवींद्र जडेजाने एप्रिल २०१६ मध्ये रीवाबा सोलंकीसोबत लग्न केले होते. त्याचा प्रेमविवाह होता आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जडेजाच्या कुटुंबाची इच्छा होती कि त्याने लवकरच लग्न करावे. पण त्याचे लक्ष फक्त क्रिकेटवर होते ज्यामुळे त्याचे लक्ष दुसरीकडे लागले नाही.
दरम्यान रवींद्र जडेजाची बहिण नैनाने तिची एक मैत्रीण रीवाबासोबत त्याची भेट घालून दिली. ते एका पार्टीमध्ये भेटले होते आणि यादरम्यान पहिल्या नजरेमध्येच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली आणि नंतर लग्न केले.
रवींद्र जडेजा आणि रीवाबा यांनी एकमेकांना भेटल्यानंतर लवकरच लग्न केले. लग्नानंतर त्यांना एक मुल झाले. जडेजाने लग्नाच्या दिवशी गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. तो खूपच सुंदर दिसत होता. तर रीवाबा ट्रेडिशनल रेड, ग्रीन आणि ऑरेंज कलरच्या लेहेंग्यामध्ये दिसली होती.
लग्नानंतर एका वर्षामध्येच रवींद्र जडेजा बाबा झाला. या कपलच्या घरी मुलगी आहे जिचे नाव निध्याना ठेवले आहे. रिवाबा आणि रवींद्र नेहमी आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत असतात. रीवाबाचे वडील व्यावसायिक होते आणि तिची आई रेल्वे कंपनीमध्ये लेखा विभागमध्ये काम करत होती. रिवाबाने राजकोटमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. ती सध्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram