भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रवी किशन यांनी भोजपुरी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. पण नुकतेच त्यांच्या कुटुंबातून एक दुखद बातमी समोर आली आहे. रवी किशन यांचा मोठा भाऊ राम किशन शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
राम किशन शुक्ला हे ५३ वर्षांचे होते. अभिनेत्याच्या भावाचे निधन आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाले. अभिनेत्याने स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट शेयर करून याची माहिती चाहत्यांना दिली आहे. सध्या रवी किशन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता मुंबईसाठी रवाना झाला आहे.
आपल्या भावाच्या निधनाची माहिती देताना रवी किशनने सोशल मिडियावर लिहिले आहे कि, दुःखद माझा छोटा भाऊ श्री रामकिशन शुक्लाजी यांचे अचानक मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ओम शांती शांती शांती, महादेवाने त्यांचं पावन चरणी त्यांना स्थान द्यावे हि प्रार्थना. रवी किशनच्या या पोस्टवर कमेंट करून चाहते आणि कलाकार दु:ख व्यक्त करत आहेत.
रवी किशनच्या या पोस्टवर कमेंट करून भोजपुरी कलाकर दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, आम्रपाली दुबे, अक्षरा सिंह इत्यादींनी दुख व्यक्त केले आहे. अभिनेत्याचा मोठा भाऊ मुंबईमध्ये राहून रवि किशनच्या प्रोडक्शनचे काम पाहत होता. माहितीनुसार आज दुपारी काम करताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली ज्यानंतर त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल केले गेले.
जिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. रवी किशनचा हा भाऊ तीन भावांमध्ये दुसऱ्या नंबरचा होता. त्यांना एक मुलगा आहे जो सरकारी नोकरी करतो, तर पत्नीचे निधन झाले आहे. गेल्या वर्षी रवी किशन यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते.
View this post on Instagram