निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता रवी जाधव मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कलाकार आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन काम करणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रवी जाधव यांच्या आई शुभांगिनी जाधव यांचे काल निधन झाले. त्यांची वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनी स्वतः सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून याबाबतची माहिती दिली आहे.
रवी जाधव यांनी इंस्टाग्रामवर आईचा एक फोटो शेयर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी दोन तारखा शेयर केल्या आहेत. आई १९ जुलै १९४८ – २७ मे २०२२. रवी जाधव यांच्या आईचे निधन झाल्याचे समजतात त्यांच्या चाहत्यांनी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
रवी जाधव यांनी शेयर केलेल्या पोस्टवर अनेक जणांनी त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. तर काहींनी रवी जाधव यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आईच्या निधनानंतर रवी जाधव यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्याच वरची ९ जानेवारी २०२१ रोजी रवी जाधव यांचे वडील हरीश्चंद्र भिकाजी जाधव यांचे निधन झाले होते. त्यांचे आई वडील हे डोबिंवलीमध्ये राहत होते. विडलांच्या निधनानंतर वर्षभरामध्ये आईचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला दुहेरी धक्का पोहोचला आहे.
रवी जाधव यांचे वडील हे गिरणी कामगार होते. रवी जाधव नेहमी आई-वडिलांची माहिती आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर करत असत. नुकतेच त्यांनी एक फोटो शेयर करून आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या होत्या.