साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आहे. अनेक तरुणांच्या गळ्यामधील ताईत असेली रश्मिकाचा क्रश कोण असेल असा प्रश्न अनेक वेळेला चाहत्यांना पडत असतो. एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री रश्मिकाने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री रश्मिकाच नाव अनेक वेळेला साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा सोबत जोडलं जात. गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड सारख्या चित्रपटांमध्ये विजय आणि रश्मिकाची केमिस्ट्री चाहत्यांचा चांगलीच आवडली होती रश्मिकाचा क्रश दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः विजयच आहे.

पण तो हा विजय नसून साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय आहे. रश्मिका थलापती विजयची खूप मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे रश्मिकाने त्याच्यासोबत काम करण्याची आपली इच्छा देखील व्यक्त केली आहे. रश्मिका अभिनेता थलापती विजयची मोठी चाहती असल्याचे तिने भीष्म चित्रपटाच्या शुटींग दरम्यान खुलासा केला होता.

दरम्यान रश्मिका सध्या तिच्या पुष्पा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. साउथमध्ये नाही तर ती सध्या देशाच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तीचा २६ वा वाढदिवस साजरा करत असून ती लवकरच बॉलीवूड चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Thalapathy vijay (@thalapathy__vijay)