धक्कादायक ! सिद्धू मुसेवाला नंतर आता ‘या’ ३४ वर्षीय रॅपरची गोळ्या झाडून ह’त्या

By Viraltm Team

Published on:

मनोरंजन विश्वामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अटलांटाच्या रॅपर ट्रबलची जॉर्जियामध्ये गो ळ्या घालून ह त्या करण्यात आली आहे. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. घरगुती ह ल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी अंदाज लावला जात आहे.

रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी याबाबत खुलासा केला आहे कि ३४ वर्षीय ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याच्या शरीरावर गोळ्यांचा खु णा आढळून आल्या आहेत. ट्रबलला जागीच मृत घोषित करण्यात आले.

ट्रबलचे खरे नाव हे मारियल सेमोंटे ऑर असं होतं. त्याची हत्या केल्याच्या आरोपावरून संशयित जेमिचेल जोन्ससाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पण अजून त्याला पकडण्यात आलेले नाही. ट्रबल अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये आपल्या मैत्रिणीला भेण्यासाठी जात असे.

संशयित हा ट्रबलच्या मैत्रिणीला ओळखत होता पण ट्रबलला ओळखत नव्हता. २०११ मध्ये ट्रबलने १७ डिसेंबर हा त्याचा पहिला मिक्सटेप प्रदर्शित केला होता. २०१८ मध्ये त्याचा एजवूड हा अल्बम रिलीज झाला होता. यावर ट्रबलने सांगितले होते कि या सर्व माझ्या आयुष्यातील कथा आहेत मला खरे नाते जोडायला फार आवडते.

Leave a Comment