शेयर मार्केट हा’द र’ले ! शेयर मार्केट किंग असलेल्या ‘या’ दिग्गज इन्वेस्टरचे नि’धन, वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

By Viraltm Team

Published on:

शेयर मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते. झुनझुनवाला यांना २-३ आठवड्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज देण्यात आला होता. दिग्गज इन्व्हेस्टर झुनझुनवाला यांच्या निधनाची पुष्टी ब्रीच कँडी हॉस्पिटलने केली आहे. आज सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.

राकेश झुनझुनवाला यांना भारतामधील वारेन बफेट म्हणून ओळखले जाते. शेयर मार्केटमधून अमाप पैसा कामवल्यानंतर बिग बुल एयरलाइन सेक्टरमध्ये देखील उतरले होते. त्यांनी आकासा एयर या नवीन एयरलाइन कंपनीची स्थापना केली होती आणि ७ ऑगस्ट रोजी कंपनीने ऑपरेशन देखील सुरु केले होते. शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे झुनझुनवाला यांच्याजवळ आज हजारो करोड रुपयांची संपत्ती आहे. झुनझुनवाला यांनी अवघ्या ५ हजार रुपयांपासून आपला प्रवास सुरु केला होता.

अकासाच्या पहिल्या कर्मशियल फ्लाईटने मुंबई ते अहमदाबाद साठी पहिल्या फ्लाईटची भरारी घेतली होती. विमानन मंत्री ज्यो तिरादित्यप सिंधिया अकासा एयरच्या पहिल्या भरारीच्या उद्घाटन समारोहसाठी उपस्थित होते. त्यांनी अकासाच्या पहिल्या कर्मशियल फ्लाईटसाठी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्य मंत्री वीके सिंह देखील उपस्थित होते. अकासा एयरने १३ ऑगस्टपासून इतर अनेक रूट्सवर आपली सर्विस सुरु केली आहे.

अकासा एयरमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखाची आहे. दोघांनी मिळून या एयरलाइन कंपनीमध्ये एकूण ४५.९७ टक्के भागीदारी केली आहे. याशिवाय विनय दुबे, संजय दुबे, नीरज दुबे, माधव भटकुली, पीएआर कॅपिटल वेंचर्स, कार्तिक वर्मा देखील अकासा एयरचे प्रमोटर आहेत.

राकेश झुनझुनवालानंतर विनय दुबेची १६.१३ टक्के भागीदारी आहे. अकासा एयरने १३ ऑगस्ट रोजी बंगळूर-कोची सेवा सुरु केली आहे. तर १९ ऑगस्ट रोजी बंगळूर-मुंबई आणि १५ सप्टेंबर रोजी चेन्नई-मुंबईसाठी आपली सर्विस सुरु करणार आहे.

भारताचे वारेन बफेट म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्या कमाईचा मुख्य स्रोत शेयर मार्केट आहे. झुनझुनवाला यांच्या सफल प्रवासासाठी सुरुवात फक्त ५ हजार रुपयांपासून झाली होती. आज त्यांची एकूण संपत्ती ४० हजार करोड रुपये इतकी आहे. या सफलतेमुळेच त्यांना इंडियन स्टॉक मार्केटचे बिगबुल आणि भारताचे वारेन बफेट म्हणून ओळखले जाते. जेव्हा सामान्य इन्व्हेस्टर शेयर मार्केटमध्ये पैसा गमवत असतात त्यावेळी देखील झुनझुनवाला कमाई करण्यात सफलत होत असतात.

Leave a Comment