भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. देशातील रेल्वे मार्गाने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेक स्थानकांवर नावाचे फलक पाहायला मिळत असतात. यातील काही नावे इतकी विचित्र असतात की ती वाचून हसू आवरत नाही. आज आपण अशाच काही अनोख्या रेल्वे स्टेशनच्या नावांबद्दल जाणून घेणार आहोत आहोत, जे ऐकल्यानंतर तुम्हाला हसू येईल.
बीवी नगर: बीवी नगर नावाचे हे रेल्वे स्टेशन तेलंगणातील भवानीगढ जिल्ह्यात येते. हे नाव वाचल्यावर लोकांना त्यांच्या बायकोची आठवण आली तर नवल करायला नको आणि त्यासोबत हे नाव ऐकल्यावर हसू देखील आवरत नाही.
साली रेल्वे स्टेशन : बीवीनंतर सालीचे नाव यायलाच पाहिजे. राजस्थानची राजधानी जयपूर विभागांतर्गत एक स्टेशन देखील येते ज्याचे नाव साली रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन त्याच्या नावामुळे खूप प्रसिद्ध आहे.
बाप रेल्वे स्टेशन: बाप रेल्वे स्टेशन राजस्थानमधील जोधपूरजवळ आहे. हे रेल्वे स्टेशन भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्रांतर्गत येते, जे त्याच्या नावासाठी खूप चर्चेत आहे.
सूअर रेल्वे स्थानक: रेल्वे स्टेशनला प्राण्यांची देखील नावे देण्यात आली आहेत. होय..सुअर स्टेशन देखील आहे जे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यामध्ये आहे.
बिल्ली स्टेशन: सूअर स्टेशन नंतर, येथे बिल्ली स्टेशन. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील धनबाद विभागात बिल्ली स्टेशन येते.
दीवाना जंक्शन: दिवाना रेल्वे स्टेशन हरियाणाच्या पानिपत येथे आहे. हे अगदी छोटं स्टेशन असलं तरी त्याच्या नावामुळे त्याची सगळीकडे क्रेझ वाढली आहे आणि हे स्टेशन खूप त्याच्या नावामुळे चर्चेत राहिले आहे.
दारू स्टेशन: दारू पिणाऱ्या लोकांसाठी हे नाव अगदी योग्य ठरू शकते. या स्टेशनचा दारूशी काहीही संबंध नसला तरी झारखंड हजारीबाग जिल्ह्यातील दारू नावाचे हे स्टेशन खूप चर्चेत आहे.
सहेली रेल्वे स्टेशन: बीवी, साली नंतर सहेली रेल्वे स्टेशन देखील खूप प्रसिद्ध आहे. सहेली रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यांतर्गत नागपूर रेल्वे विभागात येते.
नाना रेल्वे स्टेशन: नाना रेल्वे स्टेशनमुळे तुम्हाला तुमच्या आजोबांची नक्कीच आठवण येईल. हे स्टेशन राजस्थानमधील सिरोही पिंडवाडा नावाच्या ठिकाणी आहे. या रेल्वे स्थानकावर अनेक गाड्या थांबतात. हे रेल्वे स्टेशन उदयपूरच्या सर्वात जवळचे मानले जाते.
काला बकरा स्टेशन: हे स्टेशन जालंधर गावात आहे आणि ते त्याच्या नावासाठी खूप प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर या गावातील भारतीय सैनिक गुरबचन सिंग हेही खूप प्रसिद्ध आहेत. इंग्रजांनी त्यांचा गौरव केला होता.
पथरी रेल्वे स्टेशन: महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये एक लहान शहर आहे जिथे पथरी स्टेशन आहे. अमृतसर ते डेहराडूनला जाणारी पॅसेंजर ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेन या स्टेशनवरच थांबतात.
भैंसा रेल्वे स्थानक: सूअर, बिल्ली नंतर आता भैंसा रेल्वे स्थानक येते. भैंसा स्टेशन तेलंगणातील निर्मल जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
कुठे ‘साली स्टेशन’ तर कुठे ‘बाप आणि बिवी स्टेशन’, ही आहेत भारतातील १२ सर्वात फनी रेल्वे स्टेशन…
By Viraltm Team
Published on: