अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ हि वेबसिरीज सध्या चांगलीच चर्चेमध्ये आली आहे. या वेबसिरीजचा टीजर जेव्हा प्रदर्शित केला गेला त्यावेळी त्यामधील प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत यांचा बो’ल्ड अवतार पाहून साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
सर्वसामान्य चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्काच होता. त्यावेळी त्यांना खूप ट्रोल देखील करण्यात आले. पण मुलाखतीदरम्यान तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यांनी एका मुलाखतीदरम्यान प्रेक्षकांच्या मानसिकतेवर बोट ठेवत मोठे वक्तव्य केले.
त्या पुढे म्हणाल्या कि बो’ल्ड भूमिका करताना ती लोकांना आवडेल याचा विचार आम्ही कधीच केला नाही. तेजस्विनी पुढे म्हणाली कि प्र ण य प्रसंग करताना कपडे काढतात का तसेच ठेवतात. ट्रोलर्सला आम्ही मनावर घेत नाही. ट्रोलर्सवर आम्ही जास्त लक्ष देणार नाही.
मी एक महाराष्ट्राची नागरिक आहे. मला जे पटत नाही त्यावर मी नक्कीच बोलणार. पण त्यावर कोणीही काही बोलो मला फरक पडत नाही. आणखी निगरगट्ट होऊन काम करणार. प्राजक्ता आणि तेजस्विनीने या वेबसिरीजमध्ये एका सीनसाठी खूप रिटेक घेतले आहेत.
रानबाजार या वेबसिरीजमधून हे दाखवायचे होते कि जेव्हा राजकीय खेळी होत असते तेव्हा त्यामध्ये एक सामान्य माणूस अक्षरशः वि व स्त्र होतो. यावरून त्यांनी रानबाजार वेबसिरीज बनवण्याचा मूळ उद्देश सांगितला. यादरम्यान तेजस्विनी आणि प्राजक्ताने अनेक प्रश्नांवर बेधडक उत्तरे दिली.