मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीची रानबाजार हि वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. मराठी सिनेसृष्टीमधील सर्वात बोल्ड वेबसिरीज म्हणून या वेबसिरीजकडे पाहिले जात जात आहे. प्लॅनेट मराठीवर नुकतीच हि वेबसिरीज रिलीज करण्यात आली आहे.

दिग्दर्शक अभिजित पानसे हे पुन्हा एकदा एक हटके विषय दर्शकांसाठी घेऊन आले आहेत. सत्य घटनांच्या आधारावरील संदर्भित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहायला मिळालेली गोष्ट पाहायला मिळत आहे. दर्शकांना देखील हि वेबसिरीज चांगलीच पसंत पडत आहे.

सध्या रानबाजार वेबसिरीजची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. यादरम्यान आता प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने खळबळजनक वक्तव्य केले आहे. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली कि, या भूमिकेसाठी मला वजन वाढवायचे होते.

माझ्या शरीराला इतक्या सवयी लागल्या होत्या कि माझ्या शरीराला एक्स्ट्रा अन्न पचत नव्हते. त्यामुळे मला लूसमोशन व्हायचे. कधी कधी तर मला इतक्या उलट्या व्हायच्या कि खाल्लेले सर्व काही बाहेर पडायचे. कारण मी एक्सेसीव्ह खात होते.

जे माझ्या शरीराला पचत नव्हते. होत नव्हत सगळ बाहेर पडायचे. पण मला हळू हळू याची सवय लागून गेली. प्राजक्ताच्या या वक्तव्यानंतर तिचे चाहते काळजीमध्ये पडले आहेत. रानाबाजार मधील प्राजक्ताने केलेल्या रत्नाच्या भुमिकेमुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. नुकतेच या सिरीजचे तीन भाग प्रदर्शित केले गेले आहेत.