‘वे’श्ये’ची’ भूमिका करता यावी म्हणून प्राजक्ताने केले ‘हे’ काम, चक्क पुण्यातील बुधवार पेठ आणि मुंबईतील कामाठीपुरा इथं जाऊन दे’ह’वि’क्री….

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या नवीन वेबसिरीज रानबाजारमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. नुकतेच या वेबसिरीजचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत ज्यामध्ये बोल्ड दृश्ये दाखवण्यात आली आहेत. बोल्ड भूमिकेमध्ये दिसल्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळीला देखील ट्रोल करण्यात आले.

दरम्यान हि भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीला खूपच कष्ट घ्यावे लागले. याविषयी तिने पोस्ट शेयर करताना लिहिले आहे कि, हि भूमिका करण्यासाठी तिला तब्बल ११ किलो वजन वाढवावे लागले. रत्ना दिसण्यासाठी तिने ११ किलो वजन नैसर्गिकरित्या वाढवले.

प्राजक्ता माळी पुढे म्हणाली कि, मी यापूर्वी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी बबली इमेज पूर्णपणे बदलली. रत्नाची भूमिका करणे तितके सोपे नव्हते. मुळात या भूमिकेसाठी खूप अभ्यास करावा लागला. रत्नासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. रत्ना हि दे’ह’वि’क्री करणारी आहे. त्यामुळे माझे वजन वाढवल्यानंतर मी तिची देहबोली, चालणे-बोलणे, राहणीमान तिच्यामध्ये असणारा आत्मविश्वास याचा अभ्यास केला. यासाठी मला पुण्यामधील बुधवार पेठेमध्ये आणि मुंबईमधील कामाठीपुरा इथं जाऊन तिथल्या महिलांसोबत संवाद साधावा लागला.

शारीरिक बदलांसोबत मला मानसिक बदल देखील करावा लागला. त्यातून पुढे रत्नाची भूमिका समोर आली. अनेक जणांनी या भूमिकेसाठी माझे कौतुक देखील केले तर काहींना नाराजी वाटली. असो पण याकडे सकारात्मक दृष्टीनेच बघते. दरम्यान प्लॅनेट मराठीवर या वेबसिरीजचे पाच भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर आणखी पाच भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येतील. प्रेक्षकांचा देखील या वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीची हि पहिलीच वेबसिरीज आहे. यापूर्वी तिला वेबसिरीजसाठी अनेक ऑफर्स आल्या होत्या पण तिने त्या नाकारल्या. तिने वेबसिरीज बद्दल भाष्य देखील केलं होत कि, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रचंड बोल्ड कंटेंट दाखवले जाते. ज्यामुळे प्रेक्षक आकर्षित होतात. यात नवीन अस काही नाही.

Leave a Comment