मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळीची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच आलेल्या रानबाजार वेबसिरीजमुळे आणि आगामी येऊ घातलेल्या वाय चित्रपटामुळी सध्या सर्वत्र प्राजक्ताची क्रेज पाहायला मिळत आहे. रानबाजारमध्ये तिने एका वे श्ये’ची भूमिका साकारली होती ज्यासाठी तिचे विशेष कौतुक होत आहे.
सध्या प्राजक्ता वाय चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये देखील तिची एक आगळी वेगळी भूमिका दर्शकांना पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता सोशल मिडियावरून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कामध्ये राहत असते.
आपल्या चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेयर करून तिने एक चॅलेंज देखील दिले आहे. प्राजक्ताने अनेकवेळा आपले योगा करतानाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. असाच एक व्हिडीओ तिने यावेळी शेयर केला आहे.
ज्यामध्ये तिने चक्क १०८ सूर्यनमस्कार न थांबता घातले आहेत. सकाळच्या रम्य वातावरणामध्ये व्यायाम करण्याची मजा काही वेगळी असते असे देखील ती यावेळी म्हणाली. यासोबत तिने भन्नाट कॅप्शन देखील लिहिले आहे ज्यामध्ये तिने चॅलेंज दिले आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता म्हणते कि २१ तारखेला मी पुन्हा १०८ सूर्यनमस्कार घालणार आहे जर तुम्ही माझ्यासोबत करत असाल तर…मग काय म्हणता करणार का? (जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने, आज केले. योगा दिन २१ ला असतो.) कदाचित २१ ला परत करेन, तुम्ही पण माझ्याबरोबर करणार असाल तर काय म्हणता, करणार का? (जमेल तितके करा…) (सूर्यनमस्कार घालण्याच्या अनेक पद्धती आहेत… हा मैसूर style हट सूर्यनमस्कार आहे.)