पोस्ट ऑफिसची जबरदस्त आहे हि स्कीम, रिस्क न घेता मिळेल ७.६% व्याज…

By Viraltm Team

Published on:

बाजारामध्ये अनेक जोखमीच्या गुंतवणुका आहेत, ज्यामध्ये जास्त परतावा मिळण्याची आशा असते, परंतु गुंतवणूक बुडण्याची देखील भीती जास्त असते. याशिवाय अनेक स्कीम अशा देखील असतात ज्यामध्ये जोखीम नसते. ज्यामध्ये जोखीम तर नसते पण परतावा मर्यादित असतो. कमाईनंतर आपली बचन कुठेतरी गुंतवली तर त्यावर चांगला परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिस बच योजना देखील कमी कमी जोखमीच्या गुंतवणूकपैकी एक ऑप्शन मानला जातो.

पोस्ट ऑफिसस्वरे अनेक स्कीम चालवल्या जातात. यापैकी एक स्कीम म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). मात्र या योजनेमध्ये फक्त ६० वर्षांवरील लोकच गुंतवणूक करू शकतात. शिवाय ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ५० वर्षांवरील आणि ६० वर्षा पेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी काही अटींसोबत गुंतवणूक करू शकतात.

या स्कीममध्ये किमान १००० रुपये जमा केले जाऊ शकतात. तर एका व्यक्तीद्वारे उघडलेल्या सर्व SCSS खात्यांमध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत आयकर अधिनियम १९६१च्या कलम ८०C अंतर्गत या योजनेतील गुंतवणूकीचा लाभ घेता येतो.

त्याचबरोबर या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे त्यानंतर हि योजन तीन वर्षांसाठी वाढवता येऊ शकते. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत केलेल्या गुंतवणुकीसाठी या योजनेमध्ये वार्षिक ७.६% व्याजदर दिला जाईल.

व्याज त्रैमासिक देय आहे आणि पूर्णपणे करपात्र आहे. योजनेच्या मुदतपूर्तीवर कोणतेही व्याज देत नाही. शिवाय, एकदा गुंतवणूक केली की, व्याजदर संपूर्ण कार्यकाळात सारखाच राहतो.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment