पोस्ट ऑफिस पैसे गुंतवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे, पण आज आपण जाणून घेणार होत कि कसे पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेऊन शानदार बिजनेस सुरु करू शकतो. या बिजनेसला करण्यासाठी तुम्हाला फक्त ५००० रुपये गुंतवण्याची गरज आहे.
इंडिया पोस्ट अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांमध्ये १० हजार नवीन पोस्ट ऑफिस सुरु होणार आहेत. प्रत्येक पाच किलोमीटरवर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात किंवा घराजवळ पोस्ट ऑफिस उघडूनही कमाई करू शकता.
तुम्ही देखील घरी बसून पोस्ट ऑफिसवर सुरु करू शकता आणि प्रत्येक महिन्याला याद्वारे चांगली कमाई करू शकता. हे एक असे बिजनेस मॉडल, ज्याद्वारे सुरुवातीला फक्त ५००० रुपये लागतात. पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत. तुम्ही फ्रँचायझी आउटलेट उघडू शकता किंवा एजंट बनून कमाई करू शकता.
जिथे पोस्ट ऑफिसचे आपले नेटवर्क नाही पण पोस्टल सर्विसची गरज आहे तिथे फ्रँचायझी मॉडेल सुरू करता येईल. तर इंडिया पोस्टचे एजंट फिरून फिरून पोस्टल सर्विसवर कमिशनच्या मदतीने कमाई करू शकतात. हे एजंट स्टाम्पची विक्री करू शकतात.
पोस्ट ऑफिस फ्रँचायझीसाठी तुम्हाला एक अर्ज भरून जमा करावा लागेल. याचे उत्तर तुम्हाला १५ दिवसांमध्ये मिळेल. यामध्ये कमीशनच्या आधारावर कमाई होते. पगार मिळण्याची यामध्ये निश्चित रक्कम नाही. फ्रँचायझी घेण्यासाठी कमीत कमी १८ वर्षे व्या असायला हवे. कमीत कमी ८ वी पास असावे. कंप्यूटरचे नॉलेज असेल तर अधिकच चांगले.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.