पोस्ट ऑफिसमध्ये पैसा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज देखील गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस बेस्ट ऑप्शन आहे. इथे चांगल्या परताव्यासह, मनी बॅक गॅरंटी देखील येथे उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला ऑफिस आरडी बद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही ५००० रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनू शकता.
पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षाच्या आरडीवर तुम्हाला सध्या ५.८ टक्के दराने व्याजाचा फायदा मिळत आहे. या स्क्मीमध्ये तुम्हाला कमीत कमी १०० रुपये गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्ही सिंगल अकाऊंट देखील ओपन करू शकता. यासोबत ३ अडल्ट देखील मिळून ज्वाइंट अकाऊंट ओपन करू शकता.
तुम्हाला या स्कीममध्ये १० च्या पटीत पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला यामध्ये वेळेवर पैसे जमा करावे लागतील. जर तुम्ही हप्ता भरण्यास उशीर केला किव्ना विसरलात तर तुम्हाला विलंब शुल्क देखील भरावे लागेल. तुम्ही या योजनेमध्ये महिन्याला ५००० रुपये जमा केले तर तुम्हाला या स्कीमवर ५.८ टक्के दराने व्याज मिळते. जर तुम्ही ५ वर्षे नियमित गुंतवणूक केली तर तुम्हाला ३ लाख ४८ हजार ४८० रुपये मिळतील.
तुम्ही एकूण ठेव रक्कम ३ लाख रुपये होईल. तर यावर तुम्हाला जवळ जवळ १६% रिटर्न मिळेल. या स्कीमला तुम्ही ५ वर्षांसाठी वाढवू शकता. जर तुम्ही या स्कीमला ५ वर्षे वाढवले तर तुमची आरडी १० वर्षांसाठी होईल. यामध्ये तुम्हाला ८ लाख १३ हजार २३२ रुपये मॅच्युरिटीवर मिळतील. यामध्ये तुम्ही एकूण ६ लाख रुपये रक्कम जमा होईल आणि त्यावर तुम्हाला व्याजाचा देखील फायदा मिळेल.