पोलिसांनी मुलाच्या घरी पाठवले चलन, त्यानंतर बदलून गेले त्याचे संपूर्ण आयुष्य…

By Viraltm Team

Published on:

रस्त्यावर आणि अनेक गाड्यांच्या मागे तुम्ही पाहिले असेल कि दुर्घटना से देर भली. गेल्या काही दिवसांपासून ट्राफिक नियम खूपच कडक झाले आहेत. पहिला जिथे हेलमेट न घातल्यामुळे किंवा कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर पैसे देऊन प्रकरण मिटत होते. पण आता सर्व काही बदलले आहे. जर तुम्ही ट्राफिक नियम मोडला तर पोळी तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत तर तुमचे चलन सरळ तुमच्या घरी येईल.

जेव्हा देखील गाडीचे चलन होते तेव्हा लोक परेशान होतात. पण आज आपण एका अशा चलन बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे परेशानी नाही तर एकाचे घर आनंदाने भरून गेले आहे. अहमदाबादच्या एका घरामध्ये पोलिसांचे चलन पोहोचले आणि तिथले वातावरण आनंदाने भरून गेले. ऐकून तुम्हाला जरा विचित्रच वाटत असेल पण हे सत्य आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.

वास्तविक हे प्रकरण गुजरातचे आहे. जिथे एक ई चलनने दोन प्रेमीयुगुलांना कायमचे एकत्र आणले. शनिवारच्या दिवशी ट्राफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वत्सल पारेख नावाच्या मुलाच्या घरी ई चलन पाठवले गेले. ई चलनसोबत मुलाचा फोटो देखील होता, पण फोटोमध्ये तो एकटा नाही तर त्याची गर्लफ्रेंडदेखील सोबत होती. कुटुंबीय फोटो आणि चलन पाहताच हैराण झाले.

मुलाच्या कुटुंबीयांनी जेव्हा मुलाला त्या मुलीबद्दल विचारले तेव्हा त्याने सर्व काही सांगून टाकले कि तो त्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि दोघे एकमेकांवर प्रेम करतात आणि लग्न करू इच्छीतात. याची माहिती मिळताच मुलाच्या कुटुंबीयांनी मुली कुटुंबियांना बोलावून घेतले आणि दोघांचे लग्न ठरवून टाकले.

लग्न ठरताच मुलाने अहमदाबाद पोलिसांचे या चलनसाठी ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले. मुलाने ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून लिहिले कि मला पोस्टद्वारे पोलिसांचा हा मेमो मिळाला. यासोबत एक खूपच रोचक घटना घडली. या मेमोसोबत आलेल्या फोटोमध्ये मी आणि माझी गर्लफ्रेंड दिसत होतो. पहिला माझ्या आईवडिलांना याबद्दल काहीच माहिती नव्हते, पण या मेमोमुळे त्यांना सर्व काही माहिती झाले.

कदाचित त्या मुलाच्या गर्लफ्रेंडने याबद्दल कधी विचार देखील केला नसेल कि त्यांचे चलन त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. एक चलनने दोन प्रेमींना एकत्र आणले. जर अहमदाबाद पोलिसांनी हे चलन मुलाच्या घरी पाठवले नसते आणि कुटुंबिय हा फोटो पाहू शकले नसते तर त्या मुलाला आपल्या कुटुंबियांसमोर आपल्या प्रेमाबद्दल सांगायला किती वेळ लागला असता. तथापि काहीही असो पण चलनने त्या मुलाचे नशीब बदलले.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment