पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, ‘या’ घरातून सुरु झालेला तिचा प्रवास २३ व्या वर्षी लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहचला…

By Viraltm Team

Published on:

जिद्द आणि चिकाटी अंगी असली तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येऊ शकते. अशीच घटना साताराच्या बोरी गावामध्ये एका मुलीने करून दाखवली आहे. आज ती राजस्थानच्या उदयपुर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी रुजू झाली आहे. पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या नानासाहेब धायगुडे यांची मुलगी स्नेहलने हि कामगिरी करून दाखवली आहे.

खंडाळा तालुक्यातील बोरी गावामधील स्नेहलने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी IAS च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. २०१८ मध्ये स्नेहलने देशामध्ये १०८ वा नंबर मिळवला होता. त्यानंतर तिने ट्रेनिंग घेऊन ती नुकतेच राजस्थानच्या उदयपुर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी रुजू झाली आहे.

एका लहान कुटुंबामध्ये जन्मलेल्या स्नेहलने साखरवाडी येथील मराठी शाळेमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने बारामती येथील शारदा आश्रम येथून पुढचे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये बीएससी अग्रोची पदवी मिळवली.

कॉलेजमध्ये शिकत असताना स्नेहलने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१७ मध्ये अवघ्या दोन महिन्यांमध्येच तिने बेसिक तयारी करून यूपीएससीची परीक्षा दिली. पण तिला या परीक्षेमध्ये यश मिळाले नाही. पण तिने खचून न जाता आणखी अभ्यास केला आणि २०१८ मध्ये तिने पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये ती देशामध्ये १०७ वी रँक मिळवत वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी IAS झाली. विशेष म्हणजे तिने राज्यातील सर्वात तरून महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.

स्नेहलचे वडील सातारा पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत तर तिची आई गृहिणी आहे. गावाकडे शेती सांभाळत स्नेहलने हे यश मिळवले आहे. स्नेहलच्या या यशामध्ये तिच्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा असल्याचे ती सांगते. तिच्या वयाच्या मुलींची लग्न झाली पण तिच्या आईवडीलानी तिच्यावर कधीच लग्नाचा दबाव टाकला नाही ज्यामुळे ती आज हे यश मिळवू शकली आहे.

Leave a Comment